भाजीमंडई सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील
-rat१५p४१.jpg-
२६O१८०२२
चिपळूण ः चिपळूण येथील भाजीमंडईची इमारत विनावापर पडून आहे.
-----
भाजीमंडईत व्यापाऱ्यांना अपेक्षीत बदल होणार
नगराध्यक्ष सकपाळ ः प्रत्यक्ष पाहणी; २० वर्षे विनावापर, सुविधा देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : शहराच्या मध्यवर्ती असलेली भाजीमंडईची इमारत २० वर्षे विनावापर आहे. भाजी व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीचे गाळे व जशी रचना अपेक्षित आहे त्या पद्धतीने सध्याच्या इमारतीत आवश्यक बदल केले जातील आणि भाजीमंडई सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले.
भाजीमंडई सुरू करण्यासाठी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे भाजी व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भरत गांगण, दत्तात्रय वाळुंज, माजलेकर, बापू शिंदे, स्वाती खेडेकर यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते. चिपळूण शहरातील मंडईची डागडुजी करणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी दिलेल्या आराखड्यानुसार काम झाले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, असे मत उपस्थितांनी मांडले. या प्रसंगी व्यापाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर नगराध्यक्षांनी सर्व भाजी व्यापाऱ्यांसह थेट भाजीमंडईच्या इमारतीची पाहणी केली. या ठिकाणी एकूण ४३ गाळे असून, पुरेशी वायुवीजन व्यवस्था नाही. माल उतरवण्याची योग्य सोय, बाजारपेठेतील मुख्य रस्ता म्हणजेच गुहागर एसटी स्टँडच्या बाजूने प्रवेशद्वार असावे, अशा विविध सूचना व्यापाऱ्यांनी मांडल्या. व्यापाऱ्यांच्या सूचनेनुसार अंदाजपत्रक तयार करा, असे नगराध्यक्षांनी सांगितले. त्यानंतर फळभाजी मार्केटचीही नगराध्यक्षांनी पाहणी केली.
-----
चौकट
सर्व नाले स्वच्छ करण्याची सूचना
चिपळूण शहरातील पॉवरहाऊस परिसरात रिक्षा स्टॅण्डशेजारी असलेले सर्व नाले स्वच्छ असले पाहिजेत, अशा सूचना नगराध्यक्षांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत. या प्रसंगी सावंत यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गटार फुटले असून ते तातडीने दुरुस्त करा, अशी मागणी नगराध्यक्षांकडे केली तसेच रिक्षास्टॅण्ड व पॉवरहाऊस येथे एसटीचा थांबा असल्यामुळे प्रवासी व रिक्षाचालकांना अडचणींना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

