पाईपलाईनचे काम पूर्ण; डांबरीकरणाकडे दुर्लक्ष

पाईपलाईनचे काम पूर्ण; डांबरीकरणाकडे दुर्लक्ष

Published on

swt162.jpg
18175
सावंतवाडी : येथील मुख्य बाजारपेठेतील पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून, रस्त्याचे डांबरीकरण मात्र अद्याप केले नाही.

पाईपलाईनचे काम पूर्ण; डांबरीकरणाकडे दुर्लक्ष
सावंतवाडी मुख्य बाजारपेठेतील चित्र; नगरसेवक सूर्याजींकडून आक्रमकतेचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ : येथील मुख्य बाजारपेठेतील पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन दहा दिवस उलटून गेले असतानाही रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी केवळ टेंडर प्रक्रियेत व्यस्त असून, जनसामान्यांच्या समस्यांकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तत्काळ डांबरीकरणाचे काम झाले नाही, तर खणलेल्या रस्त्यातील माती व खडी पालिकेच्या दारात आणून टाकत आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही सूर्याजी यांनी दिला.
श्री. सूर्याजी म्हणाले, ‘‘नागरिकांना गढूळ पाणी येत असल्याने मुख्य बाजारपेठेत नवीन पाणीपुरवठा लाईन टाकण्यात आली होती. मात्र, हे काम पूर्ण होऊन दहा दिवस झाले तरी रस्त्याची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. रस्ता खणल्यानंतर तत्काळ दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी निष्क्रिय झाले असून, वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.’’
भर बाजारपेठेतील ही दुरवस्था अधिकाऱ्यांना दिसत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्य बाजारपेठेत तातडीने डांबरीकरण करणे आवश्यक असताना होत असलेल्या दुर्लक्षामुळे व्यापारी व नागरिकांना प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांचा माल खराब होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेचे बांधकाम अधिकारी टेंडर प्रक्रियेत गुंतले असून, सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे त्यांचे कोणतेही लक्ष नाही. या नादुरुस्त रस्त्यामुळे जर कोणतीही दुर्घटना घडली किंवा व्यापाऱ्यांचे नुकसान झाले, तर त्यास सर्वस्वी बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा इशाराही सूर्याजी यांनी दिला. आजच्या दिवसअखेर मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास, येथील माती व दगड पालिकेच्या दारात टाकून आंदोलन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासासह झालेल्या नुकसानीची माहिती त्यांच्यासमोर मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com