घोसाळकर हायस्कूलचे रेखाकला परीक्षेत सुयश

घोसाळकर हायस्कूलचे रेखाकला परीक्षेत सुयश

Published on

घोसाळकर हायस्कूलचे
रेखाकला परीक्षेत सुयश
सावर्डेः संगमेश्वर तालुक्यातील कडवई‌ येथील भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. यासाठी विद्यालयातील ९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते ते सर्व उत्तीर्ण झाले. यापैकी देवान किंजळकर, गौरव गुरव, कर्णिका मेस्त्री, साईराज सडकर यांनी अ श्रेणी प्राप्त केली तर वृषाली जोगले, दुर्वेश मेस्त्री यांनी ब श्रेणी प्राप्त केली. एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षेला १५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. या परीक्षेत अर्णवी सावंतने अ श्रेणी तर अर्णवी कानाल, आदिती रांगणेकर, वेदांत सावरटकर यांनी ब श्रेणी प्राप्त केली. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सोमनाथ कोष्टी यांचे मार्गदर्शन लाभले.
-------
राष्ट्रीय युवक सप्ताह
मांडकी येथे साजरा
सावर्डे ः मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्यावतीने ‘राष्ट्रीय युवक सप्ताह’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी चतुर्थ वर्ष विद्यार्थी मयुरी ढेकळे, सावित्री गुब्याड, अथर्व बर्गे, वैभव पवळ आणि प्रथम वर्ष विद्यार्थी कृषीराज मोरे व तुषार कांबळे या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनशैलीवर आधारित प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी स्वामीजींच्या जीवनातील विविध प्रसंग सांगतानाच तरुणांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन मनोगतातून केले. प्राचार्य डॉ. संकेत कदम यांनी युवक शक्तीचे महत्त्व विषद केले.
-------
मातीचे ढीग;
प्रवाशांना त्रास
संगमेश्वर ः मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. शास्त्रीपूल ते धामणीदरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग टाकण्यात आले आहेत. त्याचा त्रास प्रवाशांसह वाहनचालकांनाही होत आहे. रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत असतानाच गेल पाईपलाईनकडून करण्यात आलेल्या खोदकामातील माती थेट महामार्गावर टाकण्यात आल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com