-अमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करा

-अमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करा

Published on

rat१७p३.jpg-
P26O18368
रत्नागिरी- दापोली पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीनिमित्त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिक आणि पोलिस पाटील यांच्याशी थेट संवाद साधला.
----
मिशन फिनिक्स''...लोगो

अमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करा
नितीन बगाटे ः दापोली पोलिस ठाण्याची तपासणी, नागरिक, पोलिस पाटलांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी १५ जानेवारीला दापोली पोलिस ठाण्याला भेट देऊन ‘वार्षिक निरीक्षण’ तपासणी केली. या दौऱ्यात त्यांनी केवळ पोलिस कामकाजाचा आढावाच घेतला नाही तर स्थानिक नागरिक आणि पोलिस पाटील यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासोबतच अमली पदार्थमुक्त समाजासाठी ‘मिशन फिनिक्स’ प्रभावीपणे राबवण्याचे आदेश त्यांनी या वेळी दिले.
​​वार्षिक निरीक्षणादरम्यान पोलिस अधीक्षकांनी पोलिस ठाण्यातील विविध विभागांची बारकाईने पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने गुन्ह्यांची स्थिती, दाखल गुन्ह्यांचा सद्यःस्थिती अहवाल आणि प्रलंबित तपास प्रकरणांचा आढावा घेतला, जप्त केलेल्या मुद्देमालाच्या विल्हेवाटेबाबतची माहिती घेतली, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बगाटे यांनी पोलिस अधिकारी व अंमलदारांना मार्गदर्शन करताना ‘पोलिसदलात शिस्त’ हीच सर्वात महत्त्वाची असल्याचे ठामपणे सांगितले. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्या तत्परतेने सोडवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
​दापोली हे पर्यटनक्षेत्र असल्याने या भागात अमली पदार्थांचा शिरकाव होऊ नये यासाठी मिशन फिनिक्सअंतर्गत कडक मोहीम राबवण्याचे आदेश त्यांनी दिले. अमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कोणतीही गय न करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तांत्रिक उपाययोजना आणि जनजागृतीवर भर देण्याचे आदेशही या वेळी दिले. ​नागरिकांशी थेट संवाद साधला आणि अडचणीच्यावेळी ‘डायल ११२’ चा वापर करण्याचे आवाहन केले.
दापोली तालुक्यातील नागरिक आणि पोलिस पाटील यांची विशेष बैठक घेतली. या वेळी त्यांनी​सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि सायबर फसवणुकीपासून बचाव,​ महिलांची सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे पालन,​ संशयास्पद व्यक्ती किंवा घटनेची माहिती देण्यासाठी ‘डायल ११२’ चा प्रभावी वापर, नागरिकांनी मांडलेल्या विविध तक्रारी आणि सूचनांचे पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळीच निवारण करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
या वेळी खेड उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश सनम, दापोली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश तोरस्कर, सर्व पोलिस अधिकारी, अंमलदार, पोलिस पाटील आणि दापोलीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
पोलिस कल्याणासाठी पुढाकार
​केवळ कामाचा आढावा न घेता बगाटे यांनी पोलिस अंमलदारांच्या वैयक्तिक अडीअडचणी आणि आरोग्याबाबत चर्चा केली तसेच दापोली येथे सुरू असलेल्या नवीन पोलिस वसाहतीच्या बांधकामाची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली व कामाच्या दर्जाबाबत सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com