पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला!

पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला!

Published on

18388

पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला!

घारपी शाळेत पतंगोत्सव; विद्यार्थ्यांनी घेतला पारंपरिक खेळाचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ ः मोबाईल, टीव्ही आणि डिजिटल खेळांच्या जमान्यात मैदानी खेळ, पारंपरिक सण आणि लोकसंस्कृतीपासून मुले दूर जात असल्याचे चित्र दिसत असताना, घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मकर संक्रांतीनिमित्त एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. ‘पतंग उडवू चला गड्यांनो’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवत सणाचा आनंद लुटला.
मकर संक्रांती सणाचे सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून कळावे, पारंपरिक खेळांची ओळख व्हावी, या उद्देशाने शाळेत पतंगोत्सवाचे आयोजन केले होते. सकाळपासूनच शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांनी उपलब्ध साहित्याचा वापर करून फुलपाखरू, ड्रॅगन, मासा, चांदोबा तसेच विविध भौमितिक आकाराचे पतंग बनविले. विद्यार्थ्यांनी बनवलेले हे विविध रंगांचे, आकारांचे पतंग आकाशात झेपावताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, कुतूहल आणि समाधान स्पष्ट दिसत होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामूहिक सहभाग, एकमेकांना मदत करणे, संयम, एकाग्रता आणि खेळातील शिस्त यांचेही धडे मिळाले. शिक्षकांनी पतंग उडविताना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. मांजाचा गैरवापर टाळण्याचे, पक्षी व पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी पर्यावरणपूरक उपक्रमांवर विशेष भर दिला. प्लास्टिकमुक्त सण साजरा करण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक आकाशकंदील व पर्यावरण संवर्धनाविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ या संदेशातून आपुलकी आणि एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमामुळे शाळेचे वातावरण आनंदी, उत्साही झाले होते.
---
उपक्रम ठरला संस्मरणीय
घारपी शाळेच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले. पारंपरिक सण, खेळ आणि संस्कृती जपत आधुनिक शिक्षणाची सांगड घालणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. पतंगोत्सव‌ यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे, मुरलीधर उमरे तसेच पालक महेश नाईक यांचे मार्गदर्शन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com