धरणाच्या पाण्यापासून 
माडखोलवासीय वंचित

धरणाच्या पाण्यापासून माडखोलवासीय वंचित

Published on

18417

धरणाचे पाणी मिळणार कधी?

माडखोलवासीय ः शेतकऱ्यांचे नुकसान, मंगळवारपासून उपोषण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः माडखोल येथील धरणाच्या पाण्यापासून शेतकरी वंचित असून शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास २० जानेवारीपासून माडखोल मुख्य बसथांब्याच्या बाजूला कालव्यावर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांच्यावतीने राजकुमार राऊळ यांनी दिला आहे.
याबाबत पाटबंधारे खात्याला निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबरमध्ये हंगामपूर्व सभा घेणे आवश्यक असते, जेणेकरून शेतकऱ्यांना काही अडीअडचणी, समस्या असतील, तर त्या सोडवून त्यांना पाणी मिळवून देणे ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी आहे; मात्र अशी सभा न झाल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या कायम राहिल्या. पाटबंधारे विभागाला जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने ३० डिसेंबरला माडखोल मुख्य बस थांब्याच्या बाजूला असलेल्या पाईपलाईनवर उपोषणाला बसणार असल्याचे कळविले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घाईगडबडीने आपल्यासह निवडक शेतकऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली होती. त्यावेळी ८ ते १० शेतकऱ्यांना प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली होती; मात्र आज १५ दिवस उलटल्यावरही केवळ दोन-चार शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले आहेत, तर इतर शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. त्यावेळी आश्वासनामुळे उपोषण स्थगित केले होते; मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने २० जानेवारीपासून कालव्यावर बेमुदत उपोषण छेडणार असल्याचे राऊळ यांनी म्हटले आहे. पाटबंधारे विभागाने २०२० ते २०२५ पर्यंत २ कोटी रुपये खर्च करूनही ३४० पैकी २५० शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत. मंगळवारपर्यंत उजव्या व डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांना मुबलक पाणी पुरवावे, अशी मागणी राऊळ यांनी केली आहे.
---
कोट
१५ दिवस उलटल्यावरही केवळ दोन-चार शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले आहेत, तर इतर शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. त्यावेळी आश्वासनामुळे उपोषण स्थगित केले होते; मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने २० जानेवारीपासून कालव्यावर बेमुदत उपोषण छेडू.
- राजकुमार राऊळ, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com