-महाविकासकडे चार, महायुतीकडे एक समिती

-महाविकासकडे चार, महायुतीकडे एक समिती

Published on

-rat२०p३०.jpg-
२६O१९१०३
राजापूर ः नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्यासह नूतन सभापती आणि सदस्यांचे अभिनंदन करताना मुख्याधिकारी अभिजित कुंभार.
-----
राजापूर पालिकेच्या विषय समित्या निश्चित
महाविकास आघाडीकडे चार, महायुतीकडे एक समिती ; बिनविरोध निवडी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः राजापूर पालिकेच्या विषय समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्य निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीकडे शिक्षण व क्रीडा समिती, बांधकाम समिती, आरोग्य व स्वच्छता समिती आणि महिला व बालकल्याण अशा चार समित्यांचे सभापतिपद तर पाणी समितीविरोधी गट असलेल्या महायुतीकडे राहिली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे या असणार असून, सर्व समिती सभापती हे स्थायी समिती सदस्य राहणार आहेत.
उपनगराध्यक्ष विनय गुरव हे शिक्षण व क्रीडा समितीचे पदसिद्ध सभापती असणार असून, बांधकाम समिती सभापतिपदी सुबोध पवार, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समिती सभापतिपदी सुलतान ठाकूर, पाणीपुरवठा समिती सभापतिपदी सौरभ खडपे आणि महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी शबाना मुल्ला आणि उपसभापतिपदी जान्हवी वादक यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे असणार असून, सर्व समिती सभापती हे स्थायी समिती सदस्य राहणार आहेत.
गठित करण्यात आलेल्या समित्या अशा ः बांधकाम समिती ः सभापती- सुबोध पवार, सदस्य- अ‍ॅड. जमीर खलिफे, नेहा तानवडे, प्रेरणा नार्वेकर, साजिया काझी, सार्वजनिक आरोग्य रक्षण व स्वच्छता समिती ः सभापती-ः सुलतान ठाकूर, सदस्य-ः नेहा तानवडे, सिद्धांत जाधव, दिलीप अमरे, सौरभ पेणकर. पाणीपुरवठा व जलनिःस्सारण समिती ः सभापती-ः सौरभ खडपे, सदस्य-ः अ‍ॅड. जमीर खलिफे, जान्हवी वादक, अफरोज झारी, दिलीप चव्हाण. महिला व बालकल्याण समिती ः सभापती- शबाना मुल्ला, उपाध्यक्ष-ः जान्हवी वादक, सदस्य- अमिना गडकरी, उर्मिला बाकाळकर, सुयोगा जठार. शिक्षण व क्रीडा समिती ः सभापती- विनय गुरव, सदस्य-ः अफरोज झारी, सिद्धांत जाधव, अ‍ॅड. राहुल तांबे, सान्वी राव. नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती गठित करण्यात आली असून, या समितीच्या सदस्यपदी सर्व समित्यांचे सभापती असणार आहेत.
---
उपसूचना फेटाळली
राजापूर पालिकेच्या विषय समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्यपदाची आज निवडणूक झाली. मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये स्थायी समितीमध्ये अध्यक्षांसह अन्य पाच असे सहा सदस्य असावेत, असा ठराव महाविकास आघाडीचे गटनेते अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी मांडला तर स्थायी समितीमध्ये अध्यक्षांसह सहा असे सात सदस्य असावेत, अशी उपसूचना महायुतीचे गटनेते अ‍ॅड. राहुल तांबे यांनी मांडली. त्यावर सभागृहामध्ये झालेल्या मतदानामध्ये अ‍ॅड. तांबे यांनी मांडलेली उपसूचना ११ विरूद्ध १० मतांनी फेटाळण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com