सिंधुदुर्गनगरीतील खेळाडूंचे कराटे बेल्ट परीक्षेत यश

सिंधुदुर्गनगरीतील खेळाडूंचे कराटे बेल्ट परीक्षेत यश

Published on

swt212.jpg
19224
सिंधुदुर्गनगरी : यशस्वी खेळाडूंसमवेत लेफ्टनंट विवेक राणे.

सिंधुदुर्गनगरीतील खेळाडूंचे
कराटे बेल्ट परीक्षेत यश
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ः अकॅडमी ऑफ कराटे सेल्फ डिफेन्स अँड मार्शल आर्ट्सतर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेमध्ये येथील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. येथील राजमाता जिजाऊ सभागृहात ही परीक्षा पार पडली. या बेल्ट परीक्षेमध्ये सान्वी कांदळगावकर, हसरी बावलेकर, ऋतुजा पेडणेकर, दिया वायंगणकर, रुआंश ठाकूर, प्रज्ञेश कदम यांना येलो बेल्ट प्राप्त झाला.
श्रीयांश धुरी, रुद्र निवेकर, मीरा चव्हाण, स्वरा पवार, युगा मांजरेकर यांना ऑरेंज बेल्ट, देव पालकरला ब्ल्यू बेल्ट, आर्या गुप्ताने ग्रीन बेल्ट तर स्पृहा सावंत हिला पर्पल बेल्ट प्राप्त झाला. सानवी सावंत, वेदा परुळेकर व गुंजन कारेकर यांना ब्राऊन थर्ड बेल्ट प्राप्त झाला. मधुरा खडपकर, पार्थ बालम व सूरज काळे यांनी ज्युनियर ब्लॅक बेल्ट मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी बजावली. यशस्वी खेळाडूंना लेफ्टनंट विवेक राणे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंना शिवाजी नाट्यमंदिर दादरचे अध्यक्ष व माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com