राष्ट्र रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची
swt2216.jpg
19462
तळेरे ः ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वामन ताम्हणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना भालचंद्र मराठे व इतर मान्यवर.
राष्ट्र रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची
भालचंद्र मराठेः तळेरेत ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २२ : भारतात सर्व धर्मीय सलोख्याने राहतात. त्यामुळे राष्ट्र रक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे, असे प्रतिपादन तळेरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे माजी अध्यक्ष भालचंद्र मराठे यांनी वार्षिक स्नेहमेळाव्यात केले.
तळेरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा वार्षिक मेळावा येथील श्री गांगेश्वर मंदिरात माजी सरपंच चंद्रकांत तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत तळेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष मराठे, तालुकाध्यक्ष अर्जुन रावराणे, निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर, माजी सभापती दिलीप तळेकर, वामन ताम्हणकर, साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर आदी उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी यांनी, ज्येष्ठ नागरिकांनी या वयात आरोग्याची नेमकी कोणती व कशी काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या शुभांगी वरुणकर (तळेरे) आणि गजानन महादेव राणे (ओझरम) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. संघटनेच्या अध्यक्षपदी वामन ताम्हणकर यांची निवड करण्यात आली.
तळेरे गांगेश्वर मंदिर परिसरात प्रशस्त असे विरंगुळा केंद्र मंजूर झाले असून गेल्या अनेक वर्षांपासूनची ज्येष्ठ नागरिकांची मागणी पूर्ण होणार असल्याची माहिती सरपंच तळेकर व दिलीप तळेकर यांनी यावेळी दिली. चंद्रकांत तळेकर यांनी, आम्ही ज्येष्ठ नागरिक सेवा संघाला सहकार्य करण्यास नेहमीच बांधील आहोत. ज्येष्ठ नागरिक संघाचे उपक्रम ज्येष्ठांना एकत्र करण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत, असे सांगितले. या मेळाव्याला तळेरे, कासार्डे, साळिस्ते, ओझरम, दारुम, शिडवणे येथील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सुरेश पाटणकर यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी होण्यासाठी विजय सावंत, दिलीप मुद्राळे, अरुण भांबुरे, मोहन खानविलकर यांनी विशेष प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

