‘कृती आराखड्या’तील निर्देशांना हरताळ

‘कृती आराखड्या’तील निर्देशांना हरताळ

Published on

19629

‘कृती आराखड्या’तील निर्देशांना हरताळ

जयंत बरेगार ः कुडाळ पोलिसांवर आरोप, कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्रीय कार्यालयांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या ‘१०० दिवसांच्या कृती आराखड्या’तील निर्देशांना कुडाळ पोलिस प्रशासनाकडून हरताळ फासण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केला आहे. कुडाळ पोलिस ठाण्यातील अभ्यंगतांसाठी असलेल्या प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेबाबत त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, सावंतवाडी यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केली असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
श्री. बरेगार यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे, की मुख्यमंत्र्यांनी ७ जानेवारी २०२५ ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करताना सात महत्त्वाच्या मुद्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये ‘कार्यालयीन सोयी-सुविधा’ या मुद्यांतर्गत कार्यालय आणि आवारातील प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवणे व नादुरुस्त असल्यास तातडीने दुरुस्ती करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला एक वर्ष उलटूनही कुडाळ पोलिस ठाण्यात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी (ता.२१) एका अर्जाच्या चौकशीसाठी सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत ते तिथे असताना येथील प्रसाधनगृहाचा त्यांनी वापर केला. यावेळी प्रसाधनगृहाच्या भिंतींचे पोपडे निघाले असून अनेक महिन्यांपासून स्वच्छता झालेली नाही. खिडक्यांमधून वेली आत आल्या असून, तिथे उजेडाची कोणतीही व्यवस्था नाही. रात्रीच्या वेळी सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे महिला आणि पुरुष प्रसाधनगृहात पुरेसे अंतर नसून, पुरुषांच्या मुतारीची अवस्थाही अत्यंत दयनीय, जळमटांनी भरलेली आणि अंधारमय आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या कुडाळ पोलीस निरीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांची दखल घ्यावी, यासाठी बरेगार यांनी प्रसाधनगृहाचे फोटो जोडून तक्रार केली आहे. तसेच, मागील एक वर्षात या प्रसाधनगृहांच्या देखभालीवर आणि दुरुस्तीवर किती खर्च करण्यात आला, याचा लेखाजोखा घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com