गोगटे महाविद्यालयात सावित्रीच्या ज्योती भित्तीपत्रक
जी. जी. पी. एस.चे शासकीय
चित्रकला परीक्षेत यश
रत्नागिरी, ता. २५ : शासकीय चित्रकला परीक्षा अर्थात एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये जी. जी. पी. एस. चा निकाल १०० टक्के लागला. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत अ श्रेणी १५, ब श्रेणी १२, क श्रेणी १७ विद्यार्थी व इंटरमिजिएट परीक्षेत अ श्रेणी ७ , ब श्रेणी ६ व श्रेणीत ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थी व कलाशिक्षक विश्वेश टिकेकर यांचे अभिनंदन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सर्व पदाधिकारी व पालक यांनी केले.
---------
सैतवडेचे माजी पोलीस पाटील
इब्राहिम मुल्ला यांचा सन्मान
रत्नागिरी, ता. २५ : ग्रामविकास मंडळ वाटद-मिरवणे यांच्या वतीने वाटद-खंडाळा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक व समाजसेवकांचा गौरव सोहळा खंडाळा येथे झाला. सैतवडे गावचे माजी पोलीस पाटील आणि ज्येष्ठ समाजसेवक माजी पोलीस पाटील इब्राहिम मुल्ला यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे दापोली येथील राजाभाऊ यांच्या हस्ते इब्राहिम मुल्ला यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मुल्ला यांनी सैतवडे गावचे पोलीस पाटील म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली आहे. गावात सर्वधर्मीय सलोखा आणि शांतता टिकवून ठेवण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. पोलीस प्रशासनाला सहकार्य करत गावात शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
----
देव, घैसास, कीर महाविद्यालयात
इंटरव्ह्यू स्किल्स कार्यशाळा
रत्नागिरी, ता. २५ : देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात इंटरव्ह्यू स्किल्स अँड रिझ्युमे बिल्डिंग या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. इंग्रजी विभागाच्या स्टुडंट इंग्लिश लिटररी फोरम, प्लेसमेंट सेल व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख व प्लेसमेंट सेलच्या प्रमुख प्रा. वसुंधरा जाधव यांनी केले. त्यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे व रूपरेषा स्पष्ट केली. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी मार्गदर्शन केले. कला शाखा विभाग प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, विज्ञान शाखा विभागप्रमुख प्रा. वैभव घाणेकर, मार्गदर्शक शिक्षक प्रा. वैभव कीर व प्रा. आसावरी मयेकर उपस्थित होते. प्रा. वसुंधरा जाधव यांनी रिझ्युमेचे महत्त्व सांगून सांगितले. प्रा. वैभव कीर व प्रा. आसावरी मयेकर यांनी मुलाखत कौशल्य विषयावर सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीचा अनुभव दिला. सूत्रसंचालन सौमित्र जोशी यांनी केले.
---------
गोगटे महाविद्यालयात
सावित्रीच्या ज्योती भित्तीपत्रक
रत्नागिरी, ता. २५ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीच्या ज्योती या भित्तिपत्रकाचे अनावरण उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्या डॉ. सीमा कदम यांच्या हस्ते झाले. उपप्राचार्या डॉ. कदम यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या भित्तिपत्रकाला यावर्षी तीन वर्षे पूर्ण झाली. तृतीय वर्ष वाणिज्यमधील वैष्णवी पवार हिने कविता सादर केली व द्वितीय वर्ष वाणिज्यमधील लीना नांदगावकर या विद्यार्थिनीने तिचे मनोगत व्यक्त केले. डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
------
डॉ. अश्विनी देवस्थळी यांना
आधुनिक सावित्री पुरस्कार
रत्नागिरी, ता. २५ : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र महाविद्यालय (बारामती) यांच्या विद्यमाने करिअर संसदेचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन झाले. या वेळी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील (स्वायत्त) बी.एम.एस. विभागप्रमुख डॉ. अश्विनी देवस्थळी यांना करिअर कट्टाच्यावतीने आधुनिक सावित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष राजेंद्र पवार, यशदाचे उपमहासंचालक डॉ. शेखर गायकवाड, शारदाबाई पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी, राज्यस्तरीय करिअर संसदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय तळवणकर, सचिव डॉ. एस. डी. देशभ्रतार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

