''जीवनदर्शन'' स्पर्धा परीक्षेला गोवा, सिंधुदुर्गमध्ये प्रतिसाद

''जीवनदर्शन'' स्पर्धा परीक्षेला गोवा, सिंधुदुर्गमध्ये प्रतिसाद

Published on

wt275.jpg
20214
पणजी : कस्तुरबा मातोश्री हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जीवनदर्शन परीक्षेत सहभाग घेतला.

‘जीवनदर्शन’ स्पर्धा परीक्षेला गोवा, सिंधुदुर्गमध्ये प्रतिसाद
मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणचा उपक्रम; नऊ शाळातील चार हजार विद्यार्थी सहभागी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २८ ः बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन स्पर्धा परीक्षेला मोठा प्रतिसाद लाभला. या परीक्षेत ३२ हायस्कूल आणि ९ शाळांतील मिळून ४ हजार विद्यार्थी सहभागी झाले.
बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा प्रामुख्याने मालवण तालुका व परिसरातील हायस्कूल व प्राथमिक शाळेत व गोव्यातील काही हायस्कूलमध्ये झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित १५० प्रश्नोत्तरांची पुस्तिका मुलांना वाचनासाठी देण्यात आली. या पुस्तिकेवर आधारित ३५ प्रश्नांची बहुपर्यायी प्रश्नांची प्रश्नपत्रिका देण्यात आली. या परीक्षेसाठी मालवणमधील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, भंडारी हायस्कूल, रेकोबा हायस्कूल, एस. एस. कुडाळकर हायस्कूल, ल. टो. कन्याशाळा, न्यू इंग्लिश स्कूल देवबाग, ओझर विद्यामंदिर कांदळगाव, भ. ता. चव्हाण शाळा, म. मा. विद्यालय चौके, वराडकर हायस्कूल कट्टा, रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव, हि. भा. वरसकर विद्यामंदिर वराड, न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर, श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे, श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरुर, न्यू इंग्लिश स्कूल कसाल, शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट, गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगाव, आर. पी. बागवे हायस्कूल मसुरे, भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे, इं. द. वर्दम पोईप हायस्कूल, प्रगत विद्यामंदिर रामगड, आडवली हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल आचरा, भरतगड माध्यमिक विद्यालय मसुरे, सेंट पीटर्स स्कूल देवबाग, जनता विद्यामंदिर त्रिंबक, ज्ञानदीप विद्यालय वायंगणी, रोझरी चर्च स्कूल मालवण, जय गणेश स्कूल मालवण, रेवतळे शाळा मालवण, प्राथमिक शाळा सर्जेकोट, कोळंब विद्यामंदिर, शाळा कांदळगाव क्र. १, मसुरे देऊळवाडा, मसुरे क्र. १, वडाचापाट, कुडाळातील डॉ. कुडाळकर हायस्कूल पोखरण, ओसरगाव हायस्कूल, गोवा येथील द प्रोग्रेस हायस्कूल पणजी, कस्तुरबा मातोश्री हायस्कूल पणजी, डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल कुजीरा, मुस्तिफंड हायस्कूल कुजिरा आदी प्राथमिक शाळांतील ४००० विद्यार्थी या परीक्षेसाठी सहभागी झाले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रत्येक शाळेतील पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा सर्व शाळांतील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शाळांना सहभाग प्रशस्तीपत्रे लवकरच देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com