प्रजासत्ताक दिनी विविध आंदोलने
swt2723.jpg
20239
सिंधुदुर्गनगरी ः येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) विविध आंदोलने पार पडली.
प्रजासत्ताक दिनी विविध आंदोलने
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या; आचारसंहिता असल्याने प्रशासनाची पाठ
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २७ ः जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयासमोर विविध आंदोलने झाली. निवडणूक आचारसंहिता असूनही आंदोलनाची गर्दी पाहता, जनतेच्या प्रश्नांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे यातून अधोरेखित झाले.
सिंधुदुर्गनगरी परिसर काल (ता.२६) विविध आंदोलनानी फूलुन गेला होता. प्रत्येक आंदोलनकर्ते पोटतीडकीने आपल्या समस्या मांडत होते. मात्र, आचारसंहिता असल्याने पालकमंत्री यांनी भेट न दिल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली.
सिंधुदुर्गनगरीत अशी झाली आंदोलने ः
कचरा डेपोला विरोध
* कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने दत्तनगर परिसरात कचरा डेपो उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी अध्यक्ष शरद वालावलकर, नगरसेविका श्रेया गावंडे, नगरसेवक गणेश भोगटे, मंदार शिरसाट, विनायक रामदास, सुशील चिंदरकर, आनंद वालावलकर, राजू गवंडे, विनायक पाटील, आदिल शहा, अविनाश नायके, सुनील जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
दुध बिलाची रक्कम द्यावी
* जिल्ह्यातील जिल्हा दूध संघ चालावा, या उद्देशाने ११ एप्रिल २०१७ पासून जिल्हा दूध संघ कुडाळ या संघाला दूध संस्थांनी दूध पुरवठा केला होता. काही महिने नियमीत बिले मिळाली. पण, ११ ऑक्टोबर २०१७ पासून बिलाची रक्कम मिळण्यास टाळाटाळ होऊ लागली. गेली ९ वर्षे ही रक्कम मिळालेली नाही. पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांनी आश्वासने दिली होती. मात्र, अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील संस्था प्रतिनिधी, वाहतूक ठेकेदार व दूध उत्पादक शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.
डावल कुटुंबियांचे उपोषण
* हळवल-ब्राम्हणवाडी (ता.कणकवली) येथील आशा रामचंद्र डावल (वय ६५) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहे. मात्र, जमिनीला लगतदार असलेल्या जमीन मालकाकडून बांधकाम करण्यास मज्जाव केला जात आहे. जमिन मिळकतीची पोलिस प्रशासनांच्या सरंक्षणामध्ये सरकारी मोजणी झालेली असताना देखील हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे योग्य तो न्याय मिळावा या मागणीसाठी श्रीमती आशा डावल यांनी कुटुबियांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण केले.
शौचालयाची मागणी
* पाट-परबवाडा (ता. कुडाळ) ग्रामपंचायत हद्दीमध्ये पर्यटक तसेच स्थानिक लोकांना सुलभ शौचालय उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर जनतेला व पर्यटकांना त्रास होत आहे. त्यामुळे पाट म्हापण तिठा, पाट तिठा, तेली स्टॉप या तिन्ही ठिकाणी रस्त्यालगतच शासकीय जमिनीत सुलभ शौचालय बसविण्यात यावे. तसेच पाट गावातील स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग खुला करणे व तिन्ही सार्वजनिक स्मशानभूमीच्या हद्दीची सरकारी मोजणी करून दगडी कुंपण बांधणे, दिवाबत्ती सुशोभीकरण व पाण्याची व्यवस्था करावी, या मागण्यांसाठी राजाराम खोरजूवेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.
विद्युत वाहिनी पोल काढण्याची मागणी
* मडूरा (ता.सावंतवाडी) येथील प्रितेश गवंडी (रा. देऊळवाडी) यांनी आपल्या जिवीतास जाणीवपुर्वक धोका निर्माण करुन वीज वितरण कार्यालय बांदा यांनी बेकायदेशीररित्या घातलेले ११, ००० व्होल्टस् विद्युत वाहिनी पोल काढावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वाराजवळ उपोषण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

