मानवच अपशकुनी भेदभावांचा निर्माता
swt2816.jpg
20466
सावंतवाडी ः येथे जनसमुदायास मार्गदर्शन करताना काडसिध्देश्वर महाराज. बाजूला माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर.
मानवच अपशकुनी भेदभावांचा निर्माता
काडसिद्धेश्वर महाराज ः सावंतवाडीत आध्यात्मिक प्रवचन, सत्संग सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः ईश्वराने मानवी शरीराला सर्व अवयव समान दिले आहेत; मात्र माणसाने आपल्या बुद्धीने उजवा तो चांगला आणि डावा तो अपशकुनी असा भेदभाव निर्माण केला. वास्तवात डावा हात नसता, तर उजव्याला महत्त्व आलेच नसते, असे प्रतिपादन श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठाचे मठाधिपती समर्थ सद्गुरू अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले.
येथील श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट व अध्यात्म केंद्रात रविवारी (ता. २५) आयोजित आध्यात्मिक प्रवचन व सत्संग सोहळ्यात ते बोलत होते. विद्या दोन प्रकारच्या असतात. ‘अपरा विद्या’ पोट भरण्याचे साधन व कला शिकवते, तर ‘परा विद्या’ मनःशांती आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवते, असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. या सोहळ्याची सुरुवात पहाटे काकड आरती व भजनाने झाली. सायंकाळी स्वामीजींचे दिंडीच्या गजरात आगमन झाले. मठाचे अध्यक्ष परशुराम पटेकर, सचिव भगवान राऊळ व मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. सतीश राऊळ दांपत्याने पाद्यपूजा केली. यावेळी कणकवलीचे डॉ. पराग मुंडले यांचेही प्रवचन झाले.
याप्रसंगी मठातील सुविधांसाठी सहकार्य केल्याबद्दल माजी शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर यांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सचिव भगवान राऊळ व देणगीदार रमेश पै यांचाही शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत नार्वेकर, माधुरी कोरगावकर, सुमती कासकर, विनिता सातार्डेकर, शर्मिला मिशाळ, रेखा मिशाळ, रमा बांदेकर, रुपाली रेमुळकर, रविना सावंत, गणेश मिशाळ, सखाराम गावडे, मनोज वारंग, दीपक पटेकर व मळगाव येथील राऊळ कुटुंबीयांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

