बेनी नदीवरील पुलाचा प्रश्न सुटणार का0
- rat२९p१०.jpg-
P२६O२०६४३
लांजा - कांटे आणि कोट या दोन गावांना जोडण्यासाठी बेनी नदीतून उन्हाळ्यामध्ये भराव टाकून रस्ता केला आहे.
----
बेनीनदी पूल कधी उभा राहणार?
झापडे-कांटे ग्रामस्थांचा सवाल; आमदार सामंत यांना साकडे
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २९ ः लांजा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोट-कांटेसह दशक्रोशीतील गावांना जोडणाऱ्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या झापडे-कांटे येथील बेनीनदीवरील पुलाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. या महत्त्वाकांक्षी पुलाच्या कामाला यंदा मंजुरी मिळणार का? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
लांजा तालुक्यातील पश्चिम भागातील दळणवळणाच्यादृष्टीने झापडे-कांटे-कोट हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा रस्ता ‘इतर जिल्हामार्ग’ (क्र. १५) असून, त्याची एकूण लांबी १६ किमी आहे. बेनीनदीवर पूल नसल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. जर हा पूल झाला तर त्याचा थेट फायदा झापडे आणि कांटे गावांसह भडे, लावगण, खानवली, आगवे, वाडीलिंबू, वाघ्रट, बेनी आणि हर्चे या गावांना होणार आहे. विशेष म्हणजे या पुलामुळे पावस-रत्नागिरी हा दळणवळणाचा अतिशय जवळचा मार्ग उपलब्ध होणार असून, दशक्रोशीच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.
या पुलासाठी कोट गावचे माजी सरपंच शांताराम तथा आबा सुर्वे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा दिला आहे. त्यांनी केवळ पत्रव्यवहारच केला नाही तर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचे हत्यारही उपसले होते. या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने आतापर्यंत दोन ते तीनवेळा पुलाचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रकही तयार केले आहे; मात्र, संबंधित विभाग आणि शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने हा प्रस्ताव आजही कागदावरच राहिला आहे. या संदर्भात आबा सुर्वे यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि माजी आमदार राजन साळवी यांनाही वारंवार निवेदने देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. दशक्रोशीतील दळणवळणाची अडचण दूर करण्यासाठी आणि लोकांची रास्त मागणी पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांना साकडे घातले आहे.
-----
कोट
कांटे आणि कोट या दोन गावांना जोडण्यासाठी बेनीनदीवर पूल बांधणे गरजेचे आहे. यासाठी मी गेली कित्येक वर्षे शासनदरबारी पाठपुरावा करत आहे. आंदोलनाचा बडगाही उगारला तरीही शासनाला जाग येत नसल्याचे दिसून येत आहे.
- आबा सुर्वे, माजी सरपंच
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

