पोलिस क्रिकेट प्रशिक्षकपदी संदेश चव्हाणांची पुनर्निवड
swt298.jpg
O20684
संदेश चव्हाण
पोलिस क्रिकेट प्रशिक्षकपदी
संदेश चव्हाणांची पुनर्निवड
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २९ ः आयनल-मणेरवाडी (ता.कणकवली) गावचे सुपुत्र संदेश चव्हाण यांची दुसऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. गतवर्षी त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने उपविजेतेपद पटकावले होते. दुसरी राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा २०२६ साठीच्या विभागीय स्पर्धा कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अलूर येथे २८ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. या स्पर्धेत १४ राज्यांचे संघ सहभागी होणार असून, भविष्यात या स्पर्धेला राष्ट्रीय पोलिस रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा दर्जा मिळण्याची शक्यता असल्याने तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चव्हाण यांच्या निवडीबद्दल त्यांचे जिल्ह्यातून अभिनंदन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

