कणकवलीत आज दुसरे साहित्य संगीत संमेलन
कणकवलीत आज दुसरे
साहित्य संगीत संमेलन
कणकवली, ता. ३० : साहित्य संगीत मित्र मंडळ सिंधुदुर्गचे दुसरे साहित्य संगीत संमेलन उद्या (ता.३१) दुपारी साडे तीन वाजता कणकवलीतील मराठा मंडळ सभागृहात होणार आहे.
या संमेलनामध्ये उपशास्त्रीय, चित्रपट आणि भावगीते गायन, साहित्य संगीत क्षेत्रातील पुरस्कार वितरण आणि निमंत्रितांचे कवी संमेलन अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अभ्यासक आणि संगीत संशोधक डॉ.निर्मोही फडके यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी दिली.
या कार्यक्रमात लेखक संजय तांबे यांना साहित्य मैत्र पुरस्कार तर सुप्रसिद्ध गायक वादक श्याम तेंडोलकर यांना संगीत मैत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर यावेळी श्याम तेंडोलकर यांची संगीत मैफल होणार आहे. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले असून या कवी संमेलनासाठी भालचंद्र सुपेकर, मधुकर मातोंडकर, हरिश्चंद्र भिसे, संचिता चव्हाण, रिमा भोसले, रीना पाटील, निशिगंधा गावकर, प्रियदर्शनी पारकर, संगीता पाटील, विद्या पाटील, संदेश तुळसणकर, नंदिनी रावराणे, सायली नारकर, सागर कदम, हर्षल तांबे, संजय तांबे, सिद्धेश खटावकर, विजयकुमार शिंदे, माधव गावकर, अर्चना गव्हाणकर, किशोर कदम, मेघना सावंत, पल्लवी शिरगावकर ,समीक्षा चव्हाण , धम्मपाल बाविस्कर , शर्मिला केळुसकर, संदीप कदम, आर्या कदम, सुरेश पवार,सत्यवान साटम ,अमर पवार,दर्शना पाताडे, के एस वरदेकर, प्रगती पाताडे, स्वराज चव्हाण, रामचंद्र शिरोडकर, मंगेश आरेकर, नैतिक मोरजकर, सुधीर गोठणकर, सूर्यकांत साळुंखे, निलेश जाधव, मालिनी लाड, मनोहर सरमळकर, वैष्णवी सुतार या निमंत्रित कवींचे कविता वाचन होणार आहे.

