मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा
-Rat३१p३.jpg ः
२६O२१०३३
मंडणगड : मतदान जनजागृती पथनाट्य सादरीकरणावेळी उपस्थित नोडल अधिकारी कल्याणी मुळे, महाविद्यालयाचे स्वयंसेवक, स्वयंसेविका व ग्रामस्थ.
----------
मतदानासाठी जनजागृती गरजेची
कल्याणी मुळे ःमुंडे महाविद्यालयात पथनाट्य
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.३१ ः विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत आपल्या परिसरात जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसेंदिवस घटत चाललेली मतदानाची टक्केवारी चिंताजनक असून, लोकशाही बळकट ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी कल्याणी मुळे यांनी केले.
येथील मुंडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या स्वीप व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ‘मतदार जनजागृती पथनाट्य’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. अशोक कंठाळे, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, पंचायत समितीचे रेवाळे, प्राथमिक शिक्षक कुणाल आंधळगावकर, किशोर आंधळे, किशोर देवकर, बुधावले, रजपूत, पदुमले, चाफळकर आदी उपस्थित होते. स्वयंसेवकांनी मंडणगड बसस्थानक व शहर परिसरात पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

