शासकीय रेखाकला परीक्षेत यक्षिणी विद्यालयाचे यश
21069
शासकीय रेखाकला परीक्षेत
यक्षिणी विद्यालयाचे यश
सकाळ वृत्तसेवा
माणगाव, ता. ३१ ः माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय बेनगाव-माणगाव विद्यालयाने शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.
दोन्ही परीक्षेत एकूण ३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. एलिमेंटरी परीक्षेत बसलेल्या २० पैकी संगीता कदम, शर्वरी कदम, श्रवंता लोहार, वेदिका सावंत, यशराज मेस्त्री, ओमसाई कुंभार या सहा जणांनी ‘ब’ श्रेणी, रोहन वरक, सहदेव कदम, साईश तोरगळे, सुप्रिया शेटकर, उत्सवी कदम, अनुष्का शेडगे, आराध्य लाड, दुर्वेश सुकी, गौतमी कदम, पियुष धुरी, प्रांजल कासकर, पूनम नाईक, पुनित परब, आर्यन मेस्त्री यांनी ‘क’ श्रेणी मिळविली. इंटरमिजिएट परीक्षेला बसलेल्या १२ पैकी सर्व विद्यार्थ्यांनी ‘क’ श्रेणी प्राप्त केली. यात अमृता लाड, अर्जुन घाडी, बाबली वायंगणकर, दिगंबर मेस्त्री, गार्गी म्हाडगूत, जयेश परब, रेखा लोहार, रोहन तळेकर, साक्षी परब, सपना वासकर, स्वप्नाली शिंगाडे, वेलिना परेरा यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सगुण धुरी, सचिव साईनाथ नार्वेकर, उपाध्यक्ष दत्ताराम जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश रांगणेकर, शाळा समिती सदस्य मेघःश्याम पावसकर, विनायक नानचे, सदस्य चंद्रशेखर जोशी, योगेश फणसळसकर, मुख्याध्यापक गोविंद साटम, शिक्षक-पालक उपाध्यक्ष सोमा कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक सदाशिव सावंत व वैदेही भोगले यांनी मार्गदर्शन केले.

