यंदा रत्नागिरी हापूस १५ एप्रिलनंतरच बाजारात

यंदा रत्नागिरी हापूस १५ एप्रिलनंतरच बाजारात
Published on

- rat२p१३.jpg-
P२६O२१५१६
रत्नागिरी ः तालुक्यातील आंबाबागांमधील सध्याची स्थिती.
- rat२p१४.jpg-
२६O२१५१७
मोहोरलेले हापूस कलम.
------
कोकणच्या राजाचा मुकुट यंदा उशिरा
रत्नागिरी हापूसवर हवामानाचा परिणाम; , मोहोर प्रक्रिया लांबल्याने बागायतदार चिंतेत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः कोकणचा राजा आणि जगप्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी यंदा खवय्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका आंबापिकाला बसला असून, यंदा हापूस १५ एप्रिलनंतरच खऱ्या अर्थाने बाजारात दाखल होण्याची शक्यता बागायतदारांनी वर्तवली आहे.
गतवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच हापूसच्या पेट्या वाशी आणि इतर मोठ्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या होत्या; मात्र, यावर्षी चित्र पूर्णतः वेगळे आहे. यंदा मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहिला. परिणामी, आंब्याच्या झाडांना वेळेत मोहोर येण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर नवीन पालवी आली. ऑक्टोबर महिन्यात पडणारी अपेक्षित उष्णता न जाणवल्यामुळे झाडांची ‘रेस्ट पिरियड’ची प्रक्रिया विस्कळीत झाली.
विचित्र हवामान आणि विस्कळीत मोहोर डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका सुरू झाल्यानंतर आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. मात्र, हवामानातील सततच्या बदलामुळे एकाच झाडावर विचित्र चित्र पाहायला मिळत आहे. काही फांद्यांना मोहोर आला आहे तर काही ठिकाणी नवीन पालवी फुटली आहे. अनेक झाडांवर केवळ फुलोराच राहिला असून, थंडी आणि उष्णतेच्या लपंडावामुळे त्याचे फळधारणेत रूपांतर झाले नाही. ज्या ठिकाणी फळधारणा झाली तिथेही फळांची वाढ अतिशय संथगतीने होत आहे. मार्च महिन्यात रत्नागिरी हापूसची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होते; मात्र, सद्यःस्थिती पाहता १५ एप्रिलनंतरच दर्जेदार आंबा बाजारात उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा आंबाप्रेमींना हापूसच्या गोडव्यासाठी एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातून हापूसची पहिली पेटी काही दिवसांपूर्वीच रवाना झालेली आहे. त्याला दरही चांगला मिळालेला आहे; मात्र मुबलक आंब्यासाठी लोकांना प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले.
----
चौकट
उत्पादनात मोठी घट शक्य
आंबा हंगाम लांबल्याने आणि मोहोर जळण्याचे प्रमाण वाढल्याने यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. बदलत्या हवामानाचा आणि वाढत्या कीडरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागायतदारांना मोठ्या प्रमाणावर फवारणीचा खर्च करावा लागत आहे. उत्पादन खर्च वाढत असतानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com