फिटनेस, आरोग्याचा संदेश देत धावले तरुणांसह ज्येष्ठ

फिटनेस, आरोग्याचा संदेश देत धावले तरुणांसह ज्येष्ठ

Published on

21530

फिटनेस, आरोग्याचा संदेश देत धावले तरुणांसह ज्येष्ठ

परुळेतील ‘राधारंग’ची मॅरेथॉन; महिला, मुलांसह ५१५ जणांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २ ः राधारंग फाउंडेशनची मॅरेथॉन परुळे येथे रविवारी (ता. १) उत्साहात पार पडली. अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर, परुळे ते चिपी, देवली पूल या मार्गावर झालेल्या मॅरेथॉनमध्ये ५ किलोमीटरसाठी ३४६, १० किलोमीटरसाठी ११२, २१ किलोमीटरसाठी ४७ अशी ५१५ स्त्री, पुरुष, मुले मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली. अनेक व्यावसायिक, मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग आणि मुलांनी या मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सलग पाचव्या वर्षी या मॅरेथॉनला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यातील धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
डॉ. जी. टी. राणे, डॉ. जयसिंगराव राणे, हेमंत खानोलकर, कुशेवाडा सरपंच नीलेश सामंत, परुळे बाजार ग्रामपंचायत माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू, ओंकार देसाई, उमाकांत सामंत, अरुणा सामंत, भूषण देसाई आदींच्या हस्ते उद्‍घाटन करून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली.
व्यंकटेश एंटरप्राईजेसकडून मॅरेथॉनसाठी पाणी बाटल्या पुरविण्यात आल्या. तसेच यशार्थ वेलनेस सोल्युशनतर्फे सर्व सहभागींना अल्पोपाहार आणि बॉडी वॉश पॅक प्रायोजित केले होते. मॅरेथॉनसाठी ‘ओआरएस’ कुडाळ येथील डॉ. जी. टी राणे यांच्याकडून देण्यात आले. सर्व धावपटूंसाठी बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कुडाळ यांच्याकडून फिजिओथेरपी सेवा देण्यात आली. जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे, संस्कृती कला प्रतिष्ठानकडून रुग्णवाहिका उपलब्ध केल्या होत्या.
लायन्स क्लब सावंतवाडी आणि वेतोबा पेट्रोलियम मॅरेथॉनचे प्रायोजक होते. डॉ. जयसिंगराव राणे यांनी ‘रिव्हर्स रन’ करत ही मॅरेथॉन पूर्ण केली. प्रमोद भोगटे, डॉ. रावराणे, डॉ. जी. टी. राणे, ‘यशार्थ’चे विवेक सामंत, लायन्स क्लब सावंतवाडी यांना यानिमित्ताने सन्मानित करण्यात आले. या मॅरेथॉनचे आयोजन परुळे युवक कला, क्रीडा मंडळ यांच्याकडून करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com