संगमेश्वर -कोकणच्या ग्रामीण छटा चित्रकार विष्णु परीट यांच्या कुंचल्यातून झळकल्या
rat2p2.jpg
21492
विष्णू परीट
rat2p3.jpg
21493
विष्णू परीट यांनी काढलेली दोन चित्रे.
--------
चित्रकार विष्णू परीट यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर
आर्ट एन्व्हेन्यू ऑनलाईन स्पर्धा; दोन कलाकृतींची निवड
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २ ः जलरंगावर प्रभुत्व असणारे आणि संगमेश्वर तालुक्याच्या सोनवडे येथील ग्रामीण भागात वास्तव्याला असणाऱ्या निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांनी त्यांच्या जादुई कुंचल्याने आजवर राज्य, राष्ट्रीयस्तरावर अनेक बक्षिसे प्राप्त केली आहेत. परीट यांचे नाव आंतरराष्ट्रीय यादीत झळकले आहे. आर्ट एव्हेन्यू या आंतरराष्ट्रीय कला संस्थेच्यावतीने आयोजित ऑनलाइन निसर्गचित्र स्पर्धेत त्यांच्या दोन चित्रांची निवड झाली आहे. आर्ट एव्हेन्यू या आंतरराष्ट्रीय कला संस्थेच्या क्युरेशनखाली आयोजित करण्यात आलेल्या ब्रुकलीन इंटरनॅशनल अॅवॉर्ड -आर्ट अँड फोटोग्राफी प्रदर्शन जानेवारी २०२६ मध्ये आयोजित केले होते. या स्पर्धेसाठी जगभरातून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवण्यात आला. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या १३५२ कलाकृतींपैकी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय १०५ कलाकार व छायाचित्रकारांच्या १८० कलाकृतींची निवड परीक्षक समितीने केली. १८० कलाकृतींतून अंतिम १० अॅवॉर्ड विनर, २६ मेरिट अॅवॉर्ड व ३९ आउटस्टँडिंग अॅवॉर्ड अशा एकूण ७५ कलाकृतींची निवड झाली. या ऑनलाईन स्पर्धेचा व्हिडिओ युट्युबवर २० फेब्रुवारीपर्यंत पाहता येणार आहे. परीट यांची राज्याच्या विविध भागात आजवर अनेक निसर्गचित्रे प्रदर्शने झाली असून, त्यांना कला संचालनालयाचा उत्कृष्ट निसर्गचित्र कलाकृती अॅवॉर्ड प्राप्त झाला आहे. त्यांच्या एका चित्राची आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. आर्ट एव्हेन्यू या आंतरराष्ट्रीय कला संस्थेच्या ऑनलाइन प्रदर्शनासाठी परीट यांच्या कलाकृतींची निवड झाल्याबद्दल त्यांचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य चित्रकार माणिक यादव, चित्रकार अमित सुर्वे, विक्रांत बोथरे, प्रदीप कुमार देडगे, शिल्पकार रूपेश सुर्वे, चित्रकार मनोज सुतार, रंगनाथ मोरे, नाना हजारे, कलारसिक प्रा. धनंजय दळवी, कलाशिक्षक सूरज मोहिते, उद्योजक विक्रांत दर्डे आदींनी अभिनंदन केले आहे.
------------
कोट
जलरंगातील चित्रं गावाकडच्या घराभोवताली असणाऱ्या शांत आणि आत्मीय वातावरणाचं दर्शन घडवतं. झाडांच्या सावलीत विसावलेलं मातीच अंगण, कौलारू घरांची साधी रचना आणि प्रकाश-सावलीचा नाजूक खेळ या चित्रात सहजपणे उलगडतो. जलरंगाच्या हलक्या रेखाटनामधून निसर्ग आणि मानवी जीवनातील साधेपणा अधोरेखित केला आहे. सतत हालचाल करणाऱ्या लाटा, स्थिर खडक आणि आकाशातील मृदू रंगछटा या सगळ्यांमधून निसर्गातील विरोधाभास मला आकर्षित करतो. जलरंगाच्या पारदर्शकतेतून पाण्याची खोली, ओलसर वाळूची संवेदना आणि क्षितिजावरील अस्पष्टता व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
-- विष्णू परीट, निसर्ग चित्रकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

