:कोंडगावात वर्तुळाकार परसबाग प्रयोग यशस्वी

:कोंडगावात वर्तुळाकार परसबाग प्रयोग यशस्वी
Published on

rat२p२०.jpg-
२६O२१५४०
साखरपा : आरोग्यसखी दीपिका कदम आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेली वर्तुळाकार परसबाग.
-----
कोंडगावात वर्तुळाकार परसबाग
दीपिका कदम यांच्या पुढाकार ; सेंद्रिय खतांचा वापर
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २ ः कोकणात पावसाळ्यानंतर भाजीपाला लागवड करणे ही जुनीच पद्धत आहे; मात्र आता या पारंपरिक पद्धतीला फाटा देत ''वर्तुळाकार गादीवाफे'' तंत्रज्ञानाचा नवा प्रयोग आकारास येत आहे. दाभोळे क्लस्टरमधील आरोग्यसखी दीपिका कदम यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-जोयशीवाडी येथे हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे.
कदम या गेल्या पाच वर्षांपासून आरोग्यसखी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः वर्तुळाकार परसबागांचे विशेष प्रशिक्षण घेतले आणि हा प्रयोग आपल्या क्लस्टरमध्ये राबवण्याचा ध्यास घेतला. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाशी जोडले गेल्यानंतर त्यांनी बचतगटांच्या माध्यमातून हा विचार प्रत्यक्षात उतरवला आहे. कोंडगाव जोयशीवाडी येथील ‘नवलाई महिला बचतगटाने’ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली १४ वाफ्यांची एक भव्य वर्तुळाकार परसबाग फुलवली आहे. या बागेचे वैशिष्ट्य म्हणजे यात पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर केला जातो.
या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट केवळ उत्पादन घेणे नसून, समाजाचे आरोग्य सुधारणे हे आहे. कदम त्यांनी सांगितले की, ‘या ताज्या आणि विषमुक्त भाज्यांचा सर्वाधिक फायदा परिसरातील किशोरवयीन मुली, गरोदर माता आणि स्तनदा मातांना होणार आहे. यामुळे कुपोषण कमी होण्यास आणि रक्ताल्पता (ॲनिमिया) सारख्या समस्या दूर होण्यास मदत होईल.’ या प्रयोगामुळे गावातील पडीक जमीन लागवडीखाली आली असून, महिलांना घरच्या घरी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. स्थानिक बाजारपेठेत या दर्जेदार सेंद्रिय भाज्यांना मोठी मागणी असून, त्यातून बचतगटाला चांगला आर्थिक नफा मिळेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com