वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष इंगळे सोमवारपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर
21634
वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष
सोमवारपासून सिंधुदुर्गात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २ : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे हे ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्रांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचे विश्वस्त, स्वामी सेवेकरी आणि सुमारे १०० स्वामीभक्त उपस्थित राहणार आहेत.
अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील नित्यदिन पूजा-अर्चा, मठात साजरे होणारे वार्षिक सण आणि धार्मिक परंपरांची माहिती या भेटीदरम्यान भाविकांना दिली जाणार आहे. स्वामी भक्तांची श्रद्धा आणि अक्कलकोट विषयीच्या प्रेमापोटी ही सदिच्छा भेट आयोजित केली आहे. त्यांचा तीन दिवसांचा दौरा असा ः ९ फेब्रुवारीला सकाळी सातला देवगड तालुक्यातील हडपीड मठात आगमन व स्वागत, ९ ते १० वाजता अल्पोपहार, ११.३० वाजता हडपीड मठातून कणकवली श्री भालचंद्र महाराज मठाकडे प्रयाण, दुपारी १२ ते १ दरम्यान श्री भालचंद्र महाराज दर्शन व महाप्रसाद, दुपारी २ वाजता सद्गुरू राऊळ महाराज मठ (पिंगुळी, कुडाळ) भेट, सायंकाळी ५.३० वाजता टेंब्ये स्वामी महाराज मठ (माणगाव) दर्शन व रात्री महाप्रसाद, १० रोजी सकाळी ९ वाजता श्री स्वामी समर्थ मठ मिठमुंबरी दर्शन, १० वाजता श्री देव कुणकेश्वर मंदिर दर्शन, ११ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर (आचरा) दर्शन, दुपारी १२ वाजता वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात दर्शन व महाप्रसाद, ३ वाजता आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रोत्सवास उपस्थिती व दर्शन, ११ ला दिवसभर श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड येथे विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती.
हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे आणि संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी या सर्व कार्यक्रमांना आणि दर्शनाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामीभक्तांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

