कुडाळात उद्यापासून गवळदेव वर्धापन दिन

कुडाळात उद्यापासून गवळदेव वर्धापन दिन

Published on

swt36.jpg
21765
श्री गवळदेव

कुडाळात उद्यापासून
गवळदेव वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः शहरातील श्री गवळदेव मूर्ती प्रतिष्ठापना २८ वा वर्धापन दिन गुरुवार (ता. ५) ते शनिवार (ता. ७) या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती, रात्री ८ वाजता सिद्धेश कलिंगण निर्मित श्री देव कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा ‘वेडा चंदन’ नाट्यप्रयोग, शुक्रवारी (ता. ६) श्री गवळदेव मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त गवळदेव मित्रमंडळातर्फे सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत श्री गवळदेव मंदिर परिसरात बालवाडी, पहिली ते दुसरी आणि तिसरी ते चौथी अशा गटांमध्ये रंगभरण चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
दुपारी ३ ते ४ दरम्यान लहान मुलांचे कार्यक्रम, सायंकाळी ४.३० वाजता महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धा, ७ वाजता श्रींची आरती, सायंकाळी ७.३० ते ९ पर्यंत श्री सद्गुरू वारकरी भजन मंडळ, कुडाळ बुवा विशाल राणे (पखवाज अक्षय ठुंबरे) यांचे भजन, रात्री ९ वाजता नाद म्युझिक ॲकॅडमी यांचा संगीत कार्यक्रम ‘नाद संध्या’, शनिवारी (ता. ७) सकाळी ६.३० ते ८ पर्यंत नामस्मरण व श्रींची नित्यपूजा, ८ ते १२ पर्यंत लघुरुद्र, दुपारी १२ वाजता महाआरती, १२.३० ते ४.३० महाप्रसाद, सायं. ५ ते ६ वाजेपर्यंत हरिपाठ (जीवन विद्या मिशन), श्रींची आरती, रात्री ८ वाजता श्रींची पालखी मिरवणूक, ९ वाजता ‘छत्रदान’ अर्थात ‘पुण्यश्री’ हा खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, खानोली यांचा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गवळदेव मित्रमंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com