मॅरेथॉन स्पर्धेवर सार्थक, निर्वी, दक्ष, आरोहीचे वर्चस्व
- rat3p7.jpg-
26O21774
सावर्डे ः बक्षीस वितरण करताना राजन कापडी, राजेंद्र कदम, सदानंद सुर्वे, संतोष सुर्वे, संजय साळवी आदी.
मॅरेथॉनमध्ये सार्थक, निर्वी, दक्ष, आरोहीचे वर्चस्व
कुंभारखाणी ग्रामोत्कर्ष संघतर्फे आयोजन ; २५८ स्पर्धकांचा सहभाग
सकाळ वृत्तेसवा
सावर्डे, ता. ३ : मौजे कुंभारखाणी बु. ग्रामोत्कर्ष संघ मुंबई, ग्रामपंचायत कुंभारखाणी बुद्रुक, क्रीडा मंडळ (ता. संगमेश्वर) यांच्या संयुक्त विद्यमाने पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित शालेय मॅरेथॉन स्पर्धेत सार्थक गुरव, निर्वी भुवड, दक्ष मेणे, आरोही कुळे, ओम निकम, संस्कृती बाटले, विपुल साळवी, निधी शिगवण यांनी त्यांच्या गटात विजेतेपद पटकावले.
विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना, आत्मविश्वास, शिस्त, आरोग्यविषयक जागृती निर्माण व्हावी यासाठी ही स्पर्धा माध्यमिक विद्यामंदिर कुंभारखाणी बुद्रुक येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन संघाध्यक्ष संतोष सुर्वे यांच्या हस्ते तर माजी पंचायत समिती सभापती विकास सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. या प्रसंगी सदानंद सुर्वे, विजय सुर्वे, राजन कापडी, दिलीप सावंत, संजय सुर्वे, स्वप्नील सुर्वे, सचिन सुर्वे, राजेंद्र कदम, कृष्णकांत सुर्वे, संजय साळवी, सरपंच वंदना सुर्वे, दत्ताराम सुर्वे, दिलीप सुर्वे, कल्याणी लाखन, पोलिस पाटील राकेश सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय शिंदे, ग्रामसेवक राहुल चौधरी आदी उपस्थित होते. ही स्पर्धा कुंभारखाणी बुद्रुक राजिवली, कुचांबे, मुरडव, आरवली,असुर्डे, आबंतखोल, नांदगाव, कुटरे ,तळवडे गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. स्पर्धेत १५३ मुले व १०५ मुली अशा एकूण २५८ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
------
चौकट
स्पर्धेचा निकाल असा
आठ ते दहा वर्षे वयोगट (मुले - प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे) ः सार्थक गुरव, विहान कदम, सुरज सुर्वे. मुली ः निर्वी भुवड, भूमी शिंदे, आराध्या भुवड. दहा ते बारा वर्षे वयोगट (मुले) ः दक्ष मेणे, श्रेयस खांडेकर, आराध्य लांबे. दहा ते बारा वर्षे वयोगट मुली ः आरोही कुळे, ईशानी भुवड, अन्वी कदम. बारा ते चौदा वर्ष वयोगट मुले ः ओम निकम, रोहन जोशी, साई तांदळे. मुली ः संस्कृती बाटले, आरोही शिर्के, सानवी दरडे. चौदा ते सोळा वर्षे वयोगट मुले ः विपुल साळवी, अनुराज भुवड, प्रथम शिगवण. मुली ः निधी शिगवण, रिया घाणेकर, हस्ता कदम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

