आरडीसीसी बँकेला दोन पुरस्कार

आरडीसीसी बँकेला दोन पुरस्कार

Published on

- rat३p४.jpg-
P२६O२१७४१
खोपोली ः निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते बेस्ट बँक ऑफ दी इअर व इनोव्हेटिव्ह बँक ऑफ इअर पुरस्कार स्वीकारताना बँकेचे संचालक एम. एस. टिळेकर, आर. जी. गराटे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एस. पी. गिम्हवणेकर व वरिष्ठ अधिकारी दळवी व खेडसकर आदी.
----
‘आरडीसीसी’ बँकेला दोन पुरस्कार
पाच हजार कोटींचा व्यवसाय; खोपोलीत कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (आरडीसीसी) राष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे. नवी मुंबईतील इ प्लस इन्टेलेक्च्युअल मीडियातर्फे को-ऑप. बँक्स टॉप १०० समीट २०२५ मध्ये आरडीसीसी बँकेला बेस्ट बँक ऑफ दी इअर आणि इनोव्हेटिव्ह बँक ऑफ दी इअर या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
खोपोली येथील हॉटेल नोवोटेलमध्ये ३१ जानेवारी २०२६ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी इंडियन बँकिंग असोसिएशनचे डेप्युटी सीईओ गोपाळ भगत, महाराष्ट्र राज्य बँकेचे माजी कार्यकारी संचालक प्रमोद कर्नाड, महाराष्ट्र को-ऑप. बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्डाचे संचालक सतीश मराठे आणि भारत सरकारचे डेप्युटी डायरेक्टर जनरल सुन्मेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरडीसीसी बँकेने केवळ सहकार क्षेत्रातच नव्हे तर आर्थिक शिस्तीतही आदर्श निर्माण केला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय पाच हजार कोटी रुपयांवर गेला आहे. ३१ मार्च २०२५ अखेर बँकेच्या ठेवी २,८६६.८७ कोटी तर कर्जे २,१९९.६४ कोटी आहेत. सलग १५ वर्षे ऑडिट वर्ग ‘अ’ आणि सलग १३ वर्षे नक्त एनपीए ० टक्के राखण्यात बँकेला यश आले आहे.
अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेने तळागाळातील शेतकरी आणि ग्राहकांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. जिल्ह्यात बँकेची १९ एटीएम सेंटर्स असून, डिजिटल बँकिंग सेवांमध्ये बँकेने मोठी आघाडी घेतली आहे. पुरस्कार वितरणावेळी बँकेचे संचालक मधुकर टिळेकर, रामचंद्र गराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर, सरव्यवस्थापक समीर दळवी आणि उपसरव्यवस्थापक संतोष खेडसकर उपस्थित होते. या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून बँकेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
----
चौकट
बँकेला आतापर्यंत २१ पुरस्कार
बँकेच्या आजवरच्या प्रवासात महाराष्ट्र शासनाचे ‘सहकार भूषण’ आणि ‘सहकारनिष्ठ’ यांसारखे एकूण १९ पुरस्कार मिळाले असून, नव्या दोन पुरस्कारांमुळे ही संख्या २१ वर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com