वेळासच्या किनाऱ्यावर उमटला लोकशाहीचा सूर

वेळासच्या किनाऱ्यावर उमटला लोकशाहीचा सूर

Published on

- rat३p१५.jpg
२६O२१७७७
वेळास ः समुद्रकिनारी रेखाटलेली मतदान संदेश देणारी वाळूशिल्पे.
-----
वेळास किनारी उमटला लोकशाहीचा सूर
वाळूशिल्पातून मतदानाचे आवाहन; गावातून प्रभातफेरीचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३ : मतदान हा लोकशाहीचा कणा असून, प्रत्येक नागरिकाचे एकमत देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी मोलाचे असते. हाच सामाजिक संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मंडणगड तालुक्यातील वेळास समुद्रकिनाऱ्यावर आकर्षक वाळूशिल्पे साकारण्यात आली आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील ही कलाकृती सध्या पर्यटकांसह तालुकावासियांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, या माध्यमातून मतदानाची जनजागृती केली जात आहे.
आगामी २०२६ स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मंडणगड तालुक्यात प्रभावी उपक्रम राबवण्यात येत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी, पंचायत समिती मंडणगड यांच्यावतीने आयोजित मतदान जनजागृती अभियानांतर्गत २ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वेसवी, बाणकोट व वेळास येथे प्रभातफेरी तसेच वाळूशिल्पांचे आकर्षक आयोजन करण्यात आले. या उपक्रमात के. व्ही. भाटे विद्यामंदिर, वेसवी, जर्मन परकार हायस्कूल, बाणकोट मराठी शाळा तसेच वेळास नं. १ शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी काढलेल्या प्रभातफेरीवेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणांच्या माध्यमातून मतदारांना निर्भयपणे व उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वेळी केंद्रप्रमुख अहमद नाडकर, मुख्याध्यापक भोकरे, परकार, काळे, घाणे यांच्यासह सर्व सहभागी शाळांतील शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
----
चौकट
मतदानाची हाक!
सकारात्मक उपक्रमाच्या माध्यमातून केवळ विद्यार्थ्यांमध्येच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही मतदानाबाबत सकारात्मक जाणीव निर्माण झाली आहे. ‘लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक’ हा संदेश तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचला असून, येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com