चिमुकल्यांच्या वेशभूषांनी जिंकली मने

चिमुकल्यांच्या वेशभूषांनी जिंकली मने

Published on

swt312.jpg
O21826
सावंतवाडी ः वेशभूषा स्पर्धेतील पहिली ते चौथी वर्गातील सहभागी विद्यार्थी.

चिमुकल्यांच्या वेशभूषांनी जिंकली मने
सावंतवाडीतील स्पर्धा ः सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये गुणगौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्था संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये केजी विभाग व पहिली ते चौथी वर्गाची वेशभूषा स्पर्धा तसेच प्रशालेचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा नुकताच उत्साहात झाला.
यावर्षीची वेशभूषा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार ऐच्छिक विषयावर आधारीत घेण्यात आली. यामध्ये केजी विभाग व पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी गो ग्रीन, शिक्षक, शेतकरी, सैनिक, पेंग्विन, अग्निशामक, झाशीची राणी, डॉक्टर, वैमानिक, फळे, परी, पोलिस, ट्रॅफिक सिग्नल, विविध राज्यांच्या वेशभूषा, अभिनेते, पक्षी वाचवा, पृथ्वी वाचवा, स्त्री-शक्ती, विविधतेत एकता, पोषक आहार, बालकामगार असे संदेशपर विषय प्रेक्षकांसमोर मांडून वेगवेगळ्या अनोख्या वेशभूषांच्या आधारे उपस्थितांची मने जिंकली. नागेश नाईक व अंकुश कुंभार यांनी परीक्षणाचे काम पाहिले.
प्रशालेचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा व पाचवी ते नववी या वर्गांचे विज्ञान प्रदर्शन झाले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पालक-शिक्षक संघ कार्यकारिणी समितीच्या उपाध्यक्षा शाहिना बक्कर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाचे परीक्षण पंचम खेमराज महाविद्यालयाचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक सुमंगल काळे, जीवशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. शलाका वालावलकर यांनी केले. यावर्षी प्रशालेत विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पालक-शिक्षक कार्यकारिणी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रे व पदक देऊन त्यांचा गौरव केला. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, पालक-शिक्षक संघ कार्यकारिणी समितीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com