खवणे महापुरुष भराडीचा उद्यापासून वार्षिकोत्सव
खवणे महापुरुष भराडीचा
उद्यापासून वार्षिकोत्सव
म्हापण, ता. ३ ः खवणे येथील श्री देव महापुरुष भराडी यांचा वार्षिक उत्सव सोहळा गुरुवार (ता. ५) व शुक्रवार (ता. ६) या दोन दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता धार्मिक पूजाविधी व देवांना अभिषेक, सायंकाळी ४ वाजता स्थानिक लहान मुलांचे कार्यक्रम, फनी गेम्स, रात्री ९ वाजता ग्रामस्थांची भजने, शुक्रवारी सकाळी ९ वाजता होमहवन, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता गाऱ्हाणे, महाआरती, तीर्थप्रसाद, महानैवेद्य, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता फुगडी नृत्य (श्री मोरेश्वर महिला मंडळ नेरुर वाघचौडी, ता. कुडाळ), ७ वाजता श्री विठ्ठल रखुमाई वारकरी भजन मंडळ केळुस (कालवी बंदर) यांचे भजन, रात्री ८ वाजता श्री देव ब्राह्मण प्रासादिक महिला भजन मंडळ आडेली (बुवा वैशाली कोंडसकर) यांचे भजन, ९ वाजता श्री देव वेतोबा प्रासादिक वारकरी भजन मंडळ मायनेवाडी यांचे भजन, १० वाजता स्थानिक ग्रामस्थांची भजने, शनिवारी (ता. ७) पहाटे ४ वाजता काकड आरती (दर्यावर्दी भजन मंडळ, खवणे) होणार आहे. भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव महापुरुष भराडी देवस्थान समिती खवणे-भगतवाडी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

