दारुम येथे आजपासून 
कलशारोहण सोहळा

दारुम येथे आजपासून कलशारोहण सोहळा

Published on

दारुम येथे आजपासून
कलशारोहण सोहळा

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३ : श्री क्षेत्र दारुम गावडेवाडी येथील श्री स्वामी समर्थ उपासना मठाचा जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उद्यापासून (ता. ४) सुरू होत असून शुक्रवारपर्यंत (ता. ६) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
उद्या (ता. ४) दुपारी ३.३० वाजता तळेरे बसस्थानक ते कासार्डे मार्गे दारूम मठापर्यंत कलश व मूर्ती मिरवणूक शोभायात्रा, ५ वाजता धार्मिक विधी, रात्री ९ वाजता महाप्रसाद, गुरुवारी (ता. ५) सकाळी ७ वाजता धार्मिक विधी, दुपारी २ वाजता स्वरांगण संगीत विद्यालय तळेरे प्रस्तुत ‘स्वरसंध्या’ हा भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम, (विश्रांती कोयंडे आणि शिष्य परिवार), सायंकाळी ४ वाजता श्री स्थानेश्वर भजन मंडळ, किंजवडे देवगड बुवा विश्वास प्रभूदेसाई यांचे भजन, ५ वाजता श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळेरे बुवा संतोष तळेकर यांचे भजन, ६.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार रोहिणी परांजपे यांचे कीर्तन, रात्री १० वाजता गायक अक्षय नाईक (गोवा) व राधा जोशी (देवगड) यांचा ‘अभंग वाणी’ कार्यक्रम, शुक्रवारी (ता. ६) सकाळी ७ पासून धार्मिक विधी व करवीरचे कणेरी सिद्धगिरी मठाचे प.पू. चिदानंद स्वामी यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण, दुपारी २ वाजता महाप्रसाद, स्थानिक भजने, सायंकाळी ४ वाजता श्री दत्तगुरू प्रसादिक भजन मंडळ वैभववाडी बुवा विकास नर यांचे भजन, सायंकाळी ५ वाजता आई भाग्यलक्ष्मी संगीत साधना भजन मंडळ, तिवरे बुवा अजित गोसावी यांचे भजन, ६.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार संदीप मांडके रामदासी यांचे कीर्तन, रात्री ९.३० वाजता महाप्रसाद, १० वाजता माझी मायबोली राधानगरी प्रस्तुत ‘गाथा महाराष्ट्राची’ या कार्यक्रमाने सांगता होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष शांतीलाल लडगे, उपाध्यक्ष राजेंद्र तळेकर, कार्याध्यक्ष मनोज महाडिक, सचिव चंद्रकांत उर्फ राजू जठार, खजिनदार प्रवीण पोकळे व श्री स्वामी समर्थ उपासना मठ विश्वस्त मंडळ व जीर्णोध्दार समिती उत्सव समिती, दारुम गावडेवाडी यांच्यावतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com