शिवसेनेचा निर्धार मंडणगडचा सर्वांगीण विकास

शिवसेनेचा निर्धार मंडणगडचा सर्वांगीण विकास

Published on

Rat३p१८.jpg-
२६O२१७८२
मंडणगड : पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर व उपस्थित पदाधिकारी.
-----
मंडणगडच्या विकासासाठी शिवसेना सज्ज
प्रताप घोसाळकर ः पायाभूत सुविधा, रोजगार निर्मितीवर भर
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः मंडणगड तालुक्याचा सर्वांगीण व व्यापक विकास हाच शिवसेनेचा मुख्य अजेंडा असून, विकासाची वाट अधिक प्रशस्त करण्यासाठी तालुकावासियांनी शिवसेनेचे हात अधिक बळकट करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर यांनी केले.
भिंगळोली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. घोसाळकर म्हणाले की, मागासलेल्या मंडणगड तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तालुक्यात उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती सुरू असून, नजीकच्या काळात औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.
शेतकरी, महिला व तरुण अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी शासन व प्रशासन यांचा समन्वय साधून काम सुरू असून, सर्व समाजघटकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जात आहे. महायुतीच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवण्यास आम्ही आग्रही असलो तरी काही सहकारी पक्षांनी या निवडणुकीत साथ सोडल्याचे वास्तव आहे; मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या सहकार्याने आणि योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरे जात असून, ‘सहा शून्य’ असा विजय मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी प्रासंगिक कारणांनी केवळ मतांसाठी एकत्र आलेल्या महाआघाडीत मोठी बेदिली असल्याची टीका करत महाआघाडीचे नेते एकमेकांविरोधात उभे असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com