विशेष मार्गदर्शन शिबिर

विशेष मार्गदर्शन शिबिर

Published on

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ः मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा-राजापूर मुंबई या सामाजिक संस्थेच्यावतीने ‘दहावी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना’ या संकल्पनेवर आधारित दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले विशेष मार्गदर्शन शिबिरात लांजा व राजापूर तालुक्यातील १५९ विद्यार्थी सहभागी झाले होते.
दहावी बोर्ड परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा असून, या परीक्षेची भीती दूर करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा व आत्मविश्वास मिळावा, या उद्देशाने या शिबिरांचे आयोजन केले होते. लांजा खावडी येथील श्री सरस्वती विद्यानिकेतन माध्यमिक शाळा आणि राजापूर वडवली येथील उमाताई शरद परुळेकर माध्यमिक विद्यालय येथे हे शिबिर झाले. या वेळी परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचे ओझे वाटू नये यासाठी अचूक उत्तरलेखन, वेळेचे नियोजन आणि मूल्यमापन पद्धती यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. त्यात एमपीव्हीएस शैक्षणिक विभागप्रमुख वैभव भगते, माजी मुख्याध्यापक डी. डी. देसाई व रमाकांत सावंत यांनी गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयांसह परीक्षेतील अचूक लेखनपद्धत व वेळ व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. विनीत म्हादये यांनी सूत्रसंचालन, बलराम तांबे यांनी प्रास्ताविक तर महादेव हातणकर यांनी आभार मानेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com