पणदूर संविता आश्रमात बहुपयोगी वस्तूंचे वाटप

पणदूर संविता आश्रमात बहुपयोगी वस्तूंचे वाटप

Published on

swt44.jpg
22034
पणदूर ः संविता आश्रमातील अनाथ बांधवांना वस्तूंचे वाटप करताना आजी-माजी विद्यार्थी.

पणदूर संविता आश्रमात
बहुपयोगी वस्तूंचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः पणदूर येथील संविता आश्रमातील अनाथ बांधवांना श्री पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजच्या विद्यमान विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघटनेकडून बहुपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अनाथांना भेटून त्यांच्याशी हितगुज साधले.
आश्रमाच्या सेवाकार्याची माहिती व्यवस्थापक बापू सावंत यांच्याकडून जाणून घेतली. त्याआधी जीवन आनंद संस्थेच्या किनळोस येथील सक्षम आश्रमाच्या शेती व कुक्कुटपालन प्रकल्पाला विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रकल्प व्यवस्थापक श्री. कामत यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मडुरकर, सदस्य प्रकाश चव्हाण, हर्षदा ठाकूर, सहाय्यक प्राध्यापक गणू गावडे उपस्थित होते. संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर संचालिका नूतन परब, प्रा. डॉ. युवराज पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांमध्ये अनाथ बांधवांविषयी जागृकता व जबाबदारीची भावना निर्माण करणे हा हेतू होता. विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com