भाईसाहेब सावंत यांना माजगाव येथे श्रध्दांजली

भाईसाहेब सावंत यांना माजगाव येथे श्रध्दांजली

Published on

swt45.jpg
22068
माजगाव ः भाईसाहेब सावंत यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना आमदार दीपक केसरकर, विक्रांत सावंत व इतर मान्यवर.

भाईसाहेब सावंत यांना
माजगाव येथे श्रध्दांजली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः माजी मंत्री लोकनेते (स्व.) भाईसाहेब सावंत यांची १०२ वी जयंती येथील माजगाव समाधी स्थळी आज साजरी करण्यात आली. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भाईसाहेब सावंत यांना अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या माजगाव येथील प्रेरणा समाधी स्थळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, बबन साळगावकर, अमोल सावंत, प्रदीप सावंत, अजित सावंत, व्ही. बी. नाईक, चंद्रकांत नाईक, अशोक दळवी, ॲड. दिलीप नार्वेकर, संजय कानसे, रवींद्र म्हापसेकर, संदीप राणे, डॉ. दिनेश नागवेकर, प्रसाद सावंत, म. ल. देसाई, राजू कुबल, सचिन बिर्जे, संजय लाड, अर्चित पोकळे, मेघःश्याम काजरेकर, प्रा. धीरेंद्र होळीकर, एस. पी. नाईक, प्रा. सतीश बागवे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com