जेसीज फेस्टीवलमध्ये आजपासून ग्रुप डान्स स्पर्धा

जेसीज फेस्टीवलमध्ये आजपासून ग्रुप डान्स स्पर्धा

Published on

जेसीज फेस्टिवलमध्ये आजपासून
ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ४ : खेड जेसीजच्यावतीने आयोजित केलेल्या ‘जेसीज फेस्टिवल’मध्ये ग्रुप डान्स स्पर्धेचे उद्या (ता. ५) आयोजन करण्यात आले असून, यात कोकणच्या तिन्ही जिल्ह्यांतील सर्वोत्तम नृत्य प्रतिभा पाहायला मिळणार आहे.
डान्स स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील नामांकित डान्स ग्रुप्सचा सहभाग राहणार आहे. स्थानिक संस्कृतीपासून ते आधुनिक पाश्चात्त्य नृत्यापर्यंत विविध कलाप्रकार एकाच मंचावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. नृत्यासोबतच पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी फेस्टिवलमध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. कोकणी पदार्थांपासून ते चटपटीत स्ट्रीटफूडपर्यंतची मोठी रेलचेल येथे पाहायला मिळत आहे. सोबतच मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी आनंदमेळा हे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य ठरत आहे. कोकणातील तरुण कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्याची आवड असणाऱ्या रसिकांनी आणि खवय्यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जेसीजचे अध्यक्ष अमित नामुष्टे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com