खेडमध्ये मतदानासाठी २०१ मतदान केंद्रे

खेडमध्ये मतदानासाठी २०१ मतदान केंद्रे

Published on

खेडमध्ये मतदानासाठी २०१ केंद्रे
वैशाली पाटील : १ लाख ३८ हजार ९२४ मतदार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ४ : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीच्या १४ जागांसाठी १ लाख ३८ हजार ९२४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या ७० हजार ७१८ तर ६८ हजार २०६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रांची संख्या २०१ असल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी दिली.
सुकिवली, भरणे, भडगाव, दयाळ, विराचीवाडी, लोटे, धामणदेवी हे जिल्हा परिषदेचे सात गट आहेत. सुकिवली, तिसंगी, खवटी, भरणे, भडगाव, जामगे, दयाळ, बहिरवली, गुणदे, विराचीवाडी, लोटे, आंबडस, आंजणी, धामणदेवी हे १४ गण आहेत. या अंतर्गत ११४ ग्रामपंचायती समाविष्ट असून, गावांची संख्या २१५ आहे. समाविष्ट मतदान केंद्रांची संख्या २०१ इतकी आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. मतमोजणी तालुका क्रीडासंकुलात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com