तलाठी नसल्याने रामपूरमधील ग्रामस्थांची गैरसोय
तलाठी अभावी रामपूरवासींयांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः तालुक्यातील रामपूर येथील तलाठी दिवेकर कामगिरीवर आहेत की, बदली केली याबाबत रामपूरसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. गावात नियमित नऊ महिने तलाठी नाही. गुढे मालघरचे तलाठी एक-एक दिवस येतात. परिणामी, येथील ग्रामस्थांची कामे होत नाहीत. शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची महसूल विभागाची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे रामपूर येथे नियमित तलाठी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यातील रामपूर येथील तलाठी कार्यालयात रामपूरसह परिसरातील ग्रामस्थांची नेहमीच वर्दळ असते. महसूलविषयक विविध कामांसाठी येथे ग्रामस्थ येत असतात. येथे तलाठी वेळेत येत नसल्याने त्यांच्याबाबत नाराजी होती. परिणामी, येथील तलाठ्यांची बदली झाली की, त्यांना कामगिरीवर काढले, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. गुढे मालघरचे तलाठी रामपूरला येतात; मात्र त्यांच्याकडे दोन्ही गावचा पदभार असल्याने रामपूरसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी, रामपूर ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागते. शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी रामपूरसाठी कायमस्वरूपी तलाठी येथे देण्यात यावा. रामपूर येथे रामपूर, जोधगाव, तळेगाव या ठिकाणची कामे असतात. कायमस्वरूपी तलाठी नसल्याने शेतकऱ्यांना व अन्य ग्राहकांना हेलपाटे मारावे लागतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

