दहावी, बारावी परीक्षा जीवनात मैलाचे दगड

दहावी, बारावी परीक्षा जीवनात मैलाचे दगड

Published on

swt411.jpg
22073
मालवण ः दहावीच्या विद्यार्थ्यांना उद्योजक सागर वाडकर व मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

दहावी, बारावी परीक्षा जीवनात मैलाचे दगड
सागर वाडकर ः भंडारी एज्युकेशन प्रशालेत साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : शैक्षणिक विश्वात दहावी आणि बारावीच्या परीक्षांना महत्त्वाचे स्थान दिले गेल्याने आयुष्यातील एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आज विद्यार्थी उभे आहेत. दहावी आणि बारावी या केवळ परीक्षा नसून तुमच्या भविष्यातील दिशा ठरवणारे मैलाचे दगड आहेत, असे प्रतिपादन मातृत्व आधार फाउंडेशनचे सल्लागार सागर वाडकर यांनी येथे केले.
येथील मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने शहरातील भंडारी ए. सो. हायस्कूल तसेच इतर शाळांमधील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शालोपयोगी साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले, दादा वेंगुर्लेकर, प्रा. रामचंद्र काटकर, संजय हंजणकर, जगदीश तोडणकर, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, संजय लुडबे, दिक्षा लुडबे आदी उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी संतोष लुडबे यांनी, यश म्हणजे फक्त जास्त गुण मिळवणे एवढेच नसते. यश म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून, सातत्याने प्रयत्न करणे होय. शेवटच्या क्षणाला अभ्यास करून यश मिळतेच असे नाही. दररोज थोडा-थोडा अभ्यास केल्यास विषय मनावर कोरले जातात. शिक्षक व पालक हे तुमचे मार्गदर्शक असून अपयशाची भीती न बाळगता विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा, असे आवाहन केले. पर्यवेक्षक श्री. बनसोडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com