कोकण कृषि विद्यापिठाकडून आंबा बागांची पाहणी
-rat४p१२.jpg-
P२६O२२०८१
संगमेश्वर ः आंबाबागांची पाहणी करताना कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. अंबरीश.
-----
कृषि विद्यापिठाकडून आंबा बागांची पाहणी
रत्नागिरी, संगमेश्वरात पथक दाखल ; दूरगामी परिणामांवर उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः वातावरणातील बदलांचा हापूसवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून आंबाबागांची पाहणी केली जात आहे. या परिणामांचा उत्पादनावर दूरगामी परिणाम टाळण्यासाठी हे पथक उपाययोजना सुचवणार आहे. आज रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील सात ठिकाणच्या आंबा व काजू बागांची पाहणी केली. याचा अहवाल कृषी विभागाला सादर करण्यात येणार आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत जानेवारी महिन्यात कोकण कृषी विद्यापीठाला पत्र देण्यात आले होते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शास्त्रज्ञांच्या पथकाकडून पाहणी सुरू करण्यात आली आहे. यावर्षी थंडी विलंबाने सुरू झाली होती; मात्र थंडीचा कालावधी अधिक राहिल्यामुळे जिल्ह्यातील आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता; परंतु अतिथंडीमुळे मोहोराचे सेटिंग व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी आंबा बागायतदारांकडून सुरू झाल्या होत्या. याचा फटका आंबा उत्पादनावर होण्याची भीतीही वर्तवली जात आहे. यंदा आंबा हंगाम एक महिना विलंबाने येणार असल्याने बागायतदार सतर्क झालेला आहे. मागील पंधरवड्यात सलग दोनवेळा ढगाळ वातावरण होते. त्यामुळे कीटकांचा प्रादुर्भावही काही प्रमाणात वाढलेला आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठानेही पावले उचललेली आहेत.
आज रत्नागिरी तालुक्यातील शीळ, फणसोप, पावस, केळ्ये, मिरजोळे, फणसवळे परिसरातील आंबा बागायतदारांना भेटून तेथील परिस्थितीचा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आढावा घेतला. विद्यापीठाकडून डॉ. डी. डी. शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख उपस्थित होते. बागायतदार राजन कदम यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली तसेच संगमेश्वर तालुक्यातील तुरळ, कोसुंब, ताम्हाणे, चोरवणे या गावातील बागांची डॉ. अंबरिश यांनी पाहणी केली. दोन वेगवेगळी पथकं जिल्ह्यात कार्यरत असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. संगमेश्वरमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, कृषी अधिकारी मनीषा खेडेकर उपस्थित होते.
----
कोट
आंबा व काजूवर होणाऱ्या वातावरणातील बदलांची पाहणी करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाची मदत घेण्यात आली आहे. त्यांचे शास्त्रज्ज्ञ जिल्ह्यात पाहणी करणार आहेत. त्यांचा अहवाल पुढे शासनालाही सादर केला जाणार आहे.
--विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

