कर्करोग जनजागृतीला रत्नागिरीत आरंभ
कर्करोग आजाराविषयी रत्नागिरीत जनजागृती
शासकीय रुग्णालयात, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः ‘जागतिक कर्करोग दिना’चे औचित्य साधून रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्करोग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा संदेश या कार्यक्रमाद्वारे प्रशासनाने दिला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत या जनजागृती कार्यक्रम झाला. या वेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित नागरिकांना व कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या कर्करोगांबद्दल, मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या आजाराची प्रारंभिक लक्षणे कशी ओळखावीत आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून होणारे धोके यावर मार्गदर्शन केले गेले. तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व आणि उपलब्ध आधुनिक उपचारपद्धती याबाबतही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला निवासी बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. यश प्रसादे, डॉ. उत्तम कांबळे, डॉ. सुनील डोखळे आणि अधिसेविका जयश्री शिरधनकर यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि समाजात कर्करोगाबाबतची भीती दूर करून जनजागृती करण्याचा निर्धार करण्यात आला. सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांनी ‘कर्करोग मुक्ती व जनजागृती’ करण्याची सामूहिक शपथ घेतली. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप म्हणाले, कर्करोगाशी लढण्यासाठी भीती न बाळगता नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. सरकारी रुग्णालयात यावर मोफत मार्गदर्शन आणि उपचारांची सोय उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

