शिवस्मृती मंडळातर्फे शिवजयंती उत्सव

शिवस्मृती मंडळातर्फे शिवजयंती उत्सव

Published on

शिवस्मृती मंडळातर्फे
शिवजयंती उत्सव
राजापूर, ता. ४ ः तालुक्यातील शिवस्मृती मंडळातर्फे तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या नियोजनाची बैठक ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिरात झाली. शिवस्मृती मंडळाच्या कार्यकारिणीची निवड करताना मंडळाच्या अध्यक्षपदी सुबोध पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर शिवजयंती उत्सवाची रूपरेषा ठरवण्यात आली. त्यासाठी सविस्तर नियोजनासाठी शुकवारी (ता. ६) निनादेवी मंदिरात पुन्हा बैठक होणार आहे. बैठकीला संदीप मालपेकर, मंदार बावधनकर, गोविंद चव्हाण, विनायक सावंत, रूपेश शेलार, राजेंद्र नवाळे आदी उपस्थित होते. शिवस्मृती मंडळाच्या अध्यक्षपदी सुबोध पवार, उपाध्यक्षपदी हर्षदा खानविलकर, विवेक गुरव, डॉ. शुभम कुशे, खजिनदारपदी अविनाश पाटणकर, सचिवपदी अभिजित नार्वेकर, उत्सवप्रमुख म्हणून दिलीप चव्हाण, दिलीप अमरे, महेश मयेकर यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com