विधाता असगोली संघाने पटकावले विजेतेपद
‘विधाता असगोली’ संघ विजयी
क्रिकेट स्पर्धा ; ‘विशू ११ आबलोलीला’ उपविजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ५ ः खालचापाट येथील फ्रेंड सर्कल क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत विधाता असगोली संघाने विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपदाचा मान विशू ११ आबलोली संघाला मिळाला. या स्पर्धेत तालुक्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला होता.
खालचापाट येथे झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात आबलोली संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा षट्कांत ६६ धावांचे लक्ष्य असगोलीसमोर ठेवले होते. हे आव्हान विधाता असगोली संघाने अवघ्या चार षट्कांत यशस्वीरीत्या पूर्ण केले. संघाच्या या विजयात कुंदन रोहिलकर याने अवघ्या ११ चेंडूत ५० धावांची आक्रमक खेळी करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या आधी झालेल्या पहिल्या उपांत्यफेरीत आबलोली संघाने जाकाई मानाई घरटवाडी संघाचा पराभव केला होता तर दुसऱ्या उपांत्यफेरीत असगोली संघाने यजमान फ्रेंड सर्कल संघाचा सहा धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.
विजेत्या असगोली संघाला १६ हजार रुपये व चषक तर उपविजेत्या आबलोली संघाला १० हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. या वेळी विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आले. त्यात मालिकावीर, षट्कार किंग व सामनावीरचा मान रोहिलकर याला तर मकरंद पवार सर्वोत्तम फलंदाज आणि सिद्धार्थ पवार सर्वोत्तम गोलंदाज ठरला. विराज लोखंडे सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आणि मिहीर लोखंडे उगवता तारा ठरला.
या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेविका श्रीया मोरे आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मानस आरेकर यांचा मंडळाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरणावेळी प्रमोद गांधी, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, पद्माकर आरेकर, रजनीनाथ वराडकर, राज विखारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

