कॉमर्स फेस्टमध्ये पावणेसहा लाखांची उलाढाल
‘कॉमर्स फेस्ट’मधून स्वयंरोजगाराचे धडे
मोदक, भाजीपाल्याच्या विक्रीतून विद्यार्थ्यांची कमाई ; पाटपन्हाळे महाविद्यालयात उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ५ ः तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयाचा ‘कॉमर्स फेस्ट’ यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी भाजीपाला, मोदक यासह विविध पदार्थ, वस्तू यांची ठिकठिकाणी जाऊन विक्री केली. त्यामधून महाविद्यालयातील २४ ग्रुपने पाच लाख ८० हजाराच्या वस्तूंची विक्री केली आणि त्याचे सादरीकरण महाविद्यालयात केले. यामध्ये एका ग्रुपने गुहागर किनाऱ्यावर मोदकविक्रीसाठी स्टॉल लावला होता.
कॉमर्स फेस्टमध्ये चार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टचे पारितोषिक वितरण संतोष वरंडे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्याच्या युगामध्ये तंत्रज्ञानामुळे खूप मोठे बदल होत आहेत. सर्वांनी सतत नवनवीन शिकण्याची वृत्ती ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेला विद्यार्थ्यांना एकूण ३३ हजार पाचशे रुपयांची बक्षिसे, प्रमाणपत्र आणि चषक देण्यात आले. कॉमर्स क्विझ या स्पर्धेमध्ये ज्युनिअर गटामध्ये डांगे दैविक, भेकरे सिद्धी, नाटेकर ओम यांनी तर सीनियर गटामध्ये विचारे जान्हवी, काताळकर साहिल, बोटके प्रणव यांनी तसेच पावर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये कारेकर नुपूर, कुंडलिक मरूफ, आग्रे साहिल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. अॅडमॅड शो या स्पर्धेमध्ये पाटपन्हाळे जुनिअर कॉलेजच्या अपेक्षा टानकर यांच्या ग्रुपने तृतीय क्रमांक, टीवायबीकॉमच्या सानिका पागडे ग्रुपने द्वितीय क्रमांक आणि एसवायबीकॉमच्या निखिल टाणकर यांच्या ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवला. या फेस्टचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मार्केटिंग स्पर्धा होती. विद्यार्थ्यांनी सुटीच्या दिवशी बाजारपेठेमध्ये जाऊन मार्केटिंग केले. यासाठी एकूण महाविद्यालयातील २४ ग्रुपने २८ वस्तूंची पाच लाख ८० हजाराच्या वस्तूंची विक्री केली.
या स्पर्धेमध्ये बेस्ट सेल्स म्हणून प्रथम वर्ष वाणिज्यमधील जागृती टाणकर यांनी तर बेस्ट सेलर म्हणून साहिल आग्रे यांच्या ग्रुपने क्रमांक मिळवला. द्वितीय वर्ष वाणिज्यमधील साक्षी पवार यांच्या ग्रुपने साडीचे मार्केटिंग करून तिसरा तर प्रथम वर्ष वाणिज्यमधील विद्यार्थ्यांनी मोदकाचे मार्केटिंग करून दुसरा आणि भाजीपाल्याचे मार्केटिंग करणाऱ्या साहिल काताळकर ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवला. मोदकाचे मार्केटिंग करणाऱ्या ग्रुपने गुहागर बीचवर स्टॉल टाकून विक्री केली होती. तसेच भाजीपाल्याचे मार्केटिंग करणाऱ्या ग्रुपने स्वतःच्या शेतामध्ये भाजीपाला तयार केला आणि त्याचे मार्केटिंग केले आणि त्यातून आपल्याला एक चांगल्या स्वयंरोजगाराची संधी निर्माण केली. या स्पर्धेमध्ये अंजनवेल, पालशेत, वेळणेश्वर, पाटपन्हाळे ज्युनिअर कॉलेज, नवनिर्माण कॉलेज, संगमेश्वर, डीबीजे महाविद्यालय यांनी सहभाग नोंदवला.
----
महाविद्यालयाचे ऋण विसरू नका
पाटपन्हाळे महाविद्यालयातील कॉमर्स फेस्टवेळी संतोष वरंडे यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. ते म्हणाले, ज्या ठिकाणी आपण शिकलो त्या शाळा आणि महाविद्यालयाचे ऋण कधीच विसरू नका. ज्यांनी आपल्याला भरभरून दिले त्यांना काहीतरी देणे लागतो, हे सर्व विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

