नैतिक तत्वांवर सक्षमतेने ठाम राहा

नैतिक तत्वांवर सक्षमतेने ठाम राहा

Published on

swt54.jpg
22231
सावंतवाडी ः मदर क्विन्स स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. रुपेश पाटकर.

नैतिक तत्वांवर सक्षमतेने ठाम राहा
डॉ. रुपेश पाटकरः मदर क्विन्स स्कूलमध्ये समुपदेशन सत्र
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ः स्वतःच्या भावना ओळखा. स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊन त्या सरावाने विकसित करा. नैतिकदृष्ट्या योग्य तत्वावर ठाम राहा, असे मार्गदर्शन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी येथील मदर क्विन्स स्कूलमध्ये आयोजित समुपदेशन सत्रामध्ये केले.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कूलमध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी ‘कुमारवयीन अवस्थेमध्ये होणारे मानसिक, भावनिक बदल’ या विषयावर डॉ. पाटकर यांचे समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी सारासार विचार करणे, स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊन क्षमता ओळखणे व सरावाने कौशल्य विकसित करणे, स्वमर्यादांची जाणीव करून घेणे, परस्परांना आदर देऊन सुसंवाद साधणे, स्वतःच्या भावना ओळखता येणे व त्या हाताळता येणे, योग्य त्या कृतींना प्रतिसाद देणे, नैतिकदृष्ट्या योग्य तत्वावर ठाम राहणे, व्यसने व कुसंगतीपासून दूर राहणे, व्यक्ती स्वभाव ओळखण्यास शिकणे, सोशल मीडियावर होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान राहणे व दक्षता बाळगणे यासंदर्भात डॉ. पाटकर यांनी विविध उदाहरणे व अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले.
प्रशालेतर्फे मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर यांनी स्नेहभेट देऊन डॉ. पाटकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रशालेचे विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. इंतिझिया फर्नांडिस यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com