गणात कॉर्नर सभांपेक्षाही थेट प्रचारावर भर

गणात कॉर्नर सभांपेक्षाही थेट प्रचारावर भर

Published on

पावस गणात थेट प्रचारावरच भर
अपक्षामुळे चुरशीची लढत; ज्येष्ठाविरुद्ध नवा चेहरा
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ५ ः प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही शिवसेनेकडून वाडीवस्तीवर थेट गाठीभेटींवर भर दिला होता. कॉर्नर सभांपेक्षाही थेट संवादावर अधिक भर दिला गेला आहे. या जागेवर अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यामुळे येथील चुरस वाढलेली आहे.
पावस गण हा पारंपरिक भाजपचे प्राबल्य असलेला भाग आहे; मात्र शिवसेनेतील फुटीनंतर या गणात दोन्ही शिवसेनेने आपापले वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. या गणात दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे शिवसेना (शिंदे गट) व भाजप कार्यकर्ते प्रत्येक घरापर्यंत पोचण्यावर भर देत होते. मागील पाच वर्षे या परिसरात कै. सुनील नावले यांनी संघटनेची चांगली बांधणी केलेली होती. त्यांच्या निधनानंतर येथे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी शिंदे शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. नाखरे गावचे येथील नामदेव कोकरे यांना शिवसेनेकडून रिंगणात उतरवण्यात आले आहे तर त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेने माजी जिल्हा परिषद सदस्य तथा ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पावसकर यांना उभे केले आहे. त्यामुळे या ठिकाणी लढत रंगतदार होणार, हे निश्चित आहे. पावस गणात नाखरे, मावळंगे, गावडे-आंबेरे या गावांचा समावेश आहे. या ठिकाणी कुणबी सेनेचे सचिन गिजविले अपक्ष म्हणून रिंगणात असल्यामुळे चुरस वाढलेली आहे. २०१७च्या निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्या वेळी अपक्ष उमेदवाराने घेतलेल्या मतांचा शिवसेनेला लाभ झालेला होता. त्यामुळे या वेळीही अपक्ष उमेदवार किती मते घेणार, यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे.
-----
कोट १
निवडणुकीत विकासाचे व्हिजन घेऊन निघालेल्या तरुणांना नक्कीच फायदा होईल. त्या दृष्टीने यंत्रणा प्रयत्न केले गेले आहेत.
- नीलेश गजने, उपविभागप्रमुख, युवासेना, शिंदे गट
-------
कोट २
केलेल्या विकासकामांच्या जोरावर प्रयत्न सुरू आहेत. पक्षाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि जनमानसाला आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ठाकरे शिवसैनिक कार्यरत आहेत.

- दिलीप पाटील, ठाकरे शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com