उडान महोत्सवात भरारी

उडान महोत्सवात भरारी

Published on

- rat५p९.jpg-
P२६O२२२४६
रत्नागिरी ः उडान फेस्टिवलमध्ये उल्लेखनीय यश मिळवणारे देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी.

‘देव-घैसास-कीर’ची
उडान महोत्सवात भरारी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्यावतीने आयोजित ‘उडान फेस्टिवल २०२६’ मध्ये रत्नागिरीतील देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयाने आपल्या कौशल्याच्या जोरावर विविध स्पर्धांत घवघवीत यश संपादन केले आहे. या महोत्सवात महाविद्यालयाने एक सुवर्ण, एक कास्य आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावून जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात भर घातली आहे.
उडान महोत्सवात सृजनशील लेखन स्पर्धेत ईश्वरी पवार हिने सुवर्णपदक पटकावले. सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या पथनाट्य स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने प्रभावी सादरीकरण करत कास्यपदक तर पोस्टर मेकिंग स्पर्धेत साईश्वरी दशवंतराव व रचना तेरवणकर यांनी आपल्या कलाकृतींतून उपस्थितांची मने जिंकत उत्तेजनार्थ यश मिळवले. यशस्वी पथनाट्य संघाला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सुयोग बेंडल याने मार्गदर्शन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांसोबत विभागप्रमुख वैभव घाणेकर, प्रा. सानिका कीर आणि प्रा. वैभव कीर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्रभारी प्राचार्या डॉ. मधुरा पाटील तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com