कौशल्याधारित स्वयंरोजगाराकडे वळा

कौशल्याधारित स्वयंरोजगाराकडे वळा

Published on

swt59.jpg
22261
तळेरे ः ‘विजयालक्ष्मी एक्स्पो’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भैय्याजी येरमे. व्यासपीठावर निखिल दवणे, श्रीपाद वेलिंग व इतर.

कौशल्याधारित स्वयंरोजगाराकडे वळा
भैय्याजी येरम ः दळवी महाविद्यालयात ‘विजयालक्ष्मी एक्स्पो’
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ५ ः विद्यार्थ्यांनी स्वतःची कौशल्ये सातत्याने विकसित करणे आवश्यक आहे. कौशल्य विकास ही काळाची गरज असून, उपलब्ध विविध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करून स्वयंरोजगार निर्माण करता येतो, असे प्रतिपादन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी येथे केले. ते येथील दळवी महाविद्यालयात आयोजित ‘विजयालक्ष्मी एक्स्पो’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात ‘विजयालक्ष्मी एक्स्पो २०२६’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. येरमे, भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाचे रोजगार अधिकारी निखिल दवणे, मुंबई विद्यापीठाचे समन्वयक श्रीपाद वेलिंग उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालय गीताने झाली. प्राध्यापक हेमंत महाडिक यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. आपल्या मनोगतात त्यांनी शासनाची व्यवसायपूरक धोरणे, आयात-निर्यात धोरणांचे महत्त्व आणि निर्यातवाढीसाठी अधिकाधिक उद्योजक तयार होण्याची गरज अधोरेखित केली.
अध्यक्षीय भाषणात श्री. वेलिंग म्हणाले, ‘‘दळवी महाविद्यालय विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची व्यावसायिक तयारी सक्षम करत आहे. रोजगार व व्यवसाय क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना सज्ज करण्याच्या उद्देशाने राबविलेला ‘विजयालक्ष्मी एक्स्पो’ हा मार्गदर्शनपर उपक्रम स्तुत्य आहे.’’
निखिल दवणे यांनी राष्ट्रीय करिअर सेवा (एनसीएस) पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती दिली. दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेले विविध व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच केंद्र व राज्याच्या योजनांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्नेहल तळेकर (तृतीय वर्ष, बीएएफ) हिने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. निनाद दानी यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com