माजी सैनिकांसह कुटुंबीयांना मोफत विधी सेवा उपलब्ध
swt61.jpg
22441
सिंधुदुर्गनगरी:माजी सैनिकांना वीर परिवार सहायता योजनेबाबत मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती डॉ सुधीर देशपांडे, ए. ए. चेंडके आदी.
माजी सैनिकांसह कुटुंबीयांना
मोफत विधी सेवा उपलब्ध
डॉ सुधीर देशपांडे: सिंधुदुर्गनगरीत मार्गदर्शन
ओरोस, ता ६: माजी सैनिकांना वीर परिवार सहायता योजनेचा लाभ कसा घेता येईल या विषयी मार्गदर्शन करताना माजी सैनिक किंवा त्यांचे परिवार यांना मोफत विधी सेवेची आवश्यकता असल्यास त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष डॉ सुधीर देशपांडे यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गतर्फे जिल्हयातील संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक, आणि त्यांच्या अवलंबितांना (नालसा) वीर परिवार सहायता योजना २०२५ अंतर्गत या योजनेची जनजागृती होण्यासाठी शिबीराचे आयोजन केले होते. यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रभारी सचिव न्या ए. ए. चेंडके तसेच सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण प्रकाश गुरव, मुख्य लोक अभिरक्षक ॲड. आर. एच. वागज, सहाय्यक लोक अभिरक्षकॲड. श्वेता तेंडुलकर उपस्थित होते.
ॲड. श्वेता तेंडुलकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाबाबत प्रतिधारीत विधीज्ञ रूपेश परूळेकर,ॲड. रूपेश परूळेकर यांनी मार्गदर्शन केले . वीर परिवार सहायता योजनेचा उद्देश काय आहे व त्याचा कोणकोणत्या कायदेशिर बाबींमध्ये लाभ होऊ शकतो याबाबत माहिती देताना त्यांनी मालमत्ता विवाद, कल्याणकारी योजना, वैवाहिक वाद, नागरी वाद आणि इतर कायदेशिर बाबींमध्ये मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा प्रदान केली जाते असे मान्यवरांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

