टीईटी सक्ती विरोधात प्राथमिक शिक्षकांचे धरणे

टीईटी सक्ती विरोधात प्राथमिक शिक्षकांचे धरणे

Published on

swt65.jpg
O22445
दिल्ली: येथे प्राथमिक शिक्षकांनी आंदोलन केले.

टीईटी सक्ती विरोधात
प्राथमिक शिक्षकांचे धरणे
सावंतवाडी, ता. ६: प्राथमिक शिक्षकांच्या टीईटी सक्तीला विरोधासह विविध प्रश्नांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संयुक्त मोर्चाच्या वतीने गुरुवारी दिल्ली येथील जंतरमंतर येथे धरणे आंदोलन झाले. या आंदोलनात देशभरातील हजारो शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
सेवेतील शिक्षकांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सेवा मुक्त करण्याचा निर्णय न्यायालयीन प्रकरणात दिला असून त्याचबरोबर शिक्षणाचे खाजगीकरण, कमी पटाच्या शाळा मोठ्या प्रमाणावर बंद करण्यात येत आहेत. गोरगरिबांचे शिक्षण यामुळे प्रभावित होत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून देश पातळीवर काम करणाऱ्या संघटनांनी एकत्र येत संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशना दरम्यान आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. टीईटी प्रश्नी यापूर्वी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केलेली असून ती न्यायप्रविष्ठ आहे.
२४ नोव्हेंबर २०२५ ला दिल्ली येथील ऐतिहासिक जंतर-मंतर येथे प्रातिनिधिक धरणे आंदोलन करून सरकारला इशारा दिला होता. त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान व शिक्षणमंत्री यांना तसेच लोकसभा व राज्यसभेचे सर्व सन्माननीय सदस्य यांना निवेदन देण्यात आले होते.संसदेत त्यावर चर्चा झाली असली तरी ठाम निर्णय शासनाने अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे अर्थसंकल्पिय अधिवेनादरम्यान देशपातळीवर काम करणाऱ्या प्रमुख संघटनांनी हे आंदोलन केल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ राज्य उपाध्यक्ष म. ल. देसाई यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com